Riyan Parag Veping : रियान परागवर व्हेपिंग प्रकरणात कारवाई, किती सामन्यांची बंदी?

Riyan Parag Penalised For Vaping : क्रिकेटपटू हे युवा पिढीचे आदर्श असतात. मात्र असंख्य चाहत्यांचा आदर्श असलेल्या रियान पराग याला आपण काय करतोय आणि कुठे करतोय याचा विसर पडला. रियानने व्हेपिंग केलं. त्यामुळे रियानवर काय कारवाई करण्यात आली? जाणून घ्या.

Riyan Parag Veping : रियान परागवर व्हेपिंग प्रकरणात कारवाई, किती सामन्यांची बंदी?
Riyan Parag Penalised For Vaping
Image Credit source: IPL and News 9
| Updated on: Apr 30, 2026 | 6:00 PM

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याचा काही दिवसांआधी ड्रेसिंग रुममध्ये व्हेपिंग (Riyan Parag Veping) करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. राजस्थानने मंगळवारी 28 एप्रिलला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 40 व्या सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवत पंजाबचा विजयरथ रोखला होता. रियानचा या सामन्यादरम्यान ड्रेसिंग रुममध्ये व्हेपिंग करतानाचा काही सेकंदांचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे रियानवर कारवाई होणार हे निश्चित होतं. मात्र रियानवर काय कारवाई होणार? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून होती. रियानवर काही सामन्यांसाठी बंदीची कारवाई करण्यात येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र तसं काही झालेलं नाही. रियानवर करण्यात आलेली कारवाई पाहता क्रिकेटर स्वस्तात सुटला, असं म्हटलं जात आहे. रियानवर व्हेपिंग प्रकरणात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आयपीएलकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे रियानवर कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

रियानवर अशी कारवाई

रियानची व्हेपिंग प्रकरणात स्वस्तात सुटका झाली, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. रियानला एकूण सामन्याच्या मानधनापैकी 25 टक्के रक्कम ही दंड म्हणून द्यावी लागली आहे. तसेच रियानला त्याने केलेल्या कृतीसाठी 1 डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. व्हेपिंग प्रकरणी दंडात्मक कारवाई होणारा रियान पहिलाच खेळाडू ठरला आहे.

भारतात व्हेपिंग अर्थात ई-सिगरेटवर बंदी आहे. ही बंदी 2019 पासून आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार, ठराविक जागी धूम्रपान आणि व्हेपिंग करण्यावर बंदी आहे. ड्रेसिंग रुममध्येही व्हेपिंगवर बंदी आहे. मात्र रियान बिंधास्तपणे ड्रेसिंग रुममध्ये व्हेपिंग करत होता. त्यामुळेच रियानला दणका देण्यात आला आहे. रियानआधी 2020 साली एरॉन फिंच आणि एबी डीव्हीलियर्स हे दोघे SA 20 स्पर्धेत व्हेपिंग करताना आढळले होते.

रियानवर कारवाई, किती दंड?

रियान फलंदाज म्हणून अपयशी

दरम्यान रियानने या मोसमात कर्णधार म्हणून आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. रियानने त्याच्या नेतृत्वात राजस्थानला 9 पैकी 6 सामन्यांत विजयी केलं आहे. मात्र रियानला फलंदाज म्हणून काही खास करता आलेलं नाही. रियान पराग याने 9 सामन्यांत 14.6 च्या सरासरीने 117 धावा केल्या आहेत. राजस्थानचा या मोहिमेतील 10 वा सामना हा 1 मे रोजी होणार आहे. राजस्थानसमोर या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सचं आव्हान असणार आहे.

Follow Us