RR vs DC : केएल-पाथुमचा धमाका, दिल्लीचा रॉयल विजय, राजस्थानचा 7 विकेट्सने धुव्वा

Rajasthan Royals vs Delhi Capitals Match Result, IPL 2026 : दिल्ली कॅपिट्ल्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात एकूण चौथा विजय हा विजयी धावांचा पाठलाग करताना मिळवला आहे. दिल्लीने इतिहासातील आपल्या सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करुन दाखवला.

RR vs DC : केएल-पाथुमचा धमाका, दिल्लीचा रॉयल विजय, राजस्थानचा 7 विकेट्सने धुव्वा
Pathum Nissanka and KL Rahul DC vs RR
Image Credit source: Bcci
| Updated on: May 02, 2026 | 6:56 AM

दिल्ली कॅपिट्ल्सने अक्षर पटेल याच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 43 व्या सामन्यात इतिहास घडवला आहे. दिल्लीने होम टीम राजस्थानला पराभूत करत आपल्या सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करुन 2 गुणांची कमाई केली आहे. राजस्थान रॉयल्सने दिल्लीसमोर जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये 226 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दिल्लीने हे आव्हान 5 बॉलआधी 7 विकेट्स राखून पूर्ण केलं.दिल्लीने 19.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 226 धावा केल्या. दिल्लीने अशाप्रकारे या मोसमातील चौथा सामना जिंकला. दिल्ली 4 सामने जिंकणारी सहावी टीम ठरली.

रियान पराग याने केलेल्या 90 रन्सच्या मदतीने राजस्थानने 225 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीने याआधी कधीच इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला नव्हता. त्यामुळे राजस्थानच्या विजयाची आशा तुलनेत जास्त होती. मात्र दिल्लीने इतिहास बदलला. दिल्लीसाठी पाचही फलंदाजांनी कमाल बॅटिंग केली आणि टीमला जिंकवलं.

सलामी शतकी भागीदारी

पाथुम निसांका आणि केएल राहुल या सलामी जोडीने शतकी भागीदारी करुन दिल्लीला ठोस सुरुवात दिली. तसेच या दोघांनी दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. पाथुम आणि केएलने पहिल्या विकेटसाठी 57 बॉलमध्ये 117 रन्सची पार्टनरशीप केली. पाथुमनच्या रुपात दिल्लीने पहिली विकेट गमावली. पाथुमने 33 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 6 फोरसह एकूण 62 धावा केल्या.

त्यानंतर केएल राहुलने नितीश राणा याच्यासह अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी 30 चेंडूत 61 धावा जोडल्या. त्यामुळे दिल्लीने सामन्यावर पकड घट्ट केली. त्यांनतर राजस्थानने दिल्लीला झटपट 2 झटके दिले. नितीश राणा 33 धावांवर बाद झाला. तर केएल राहुल याने सर्वाधिक धावा केल्या. केएलने 40 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 6 फोरसह 75 रन्स केल्या.

त्यानंतर चौथ्या विकेटसाठी ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा या दोघांनी नाबाद 49 धावांची भागीदारी केली आणि दिल्लीला जिंकवलं. ट्रिस्टनने 18 आणि आशुतोषने 25 धावा केल्या. राजस्थानसाठी रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर आणि तुषार देशपांडे या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

राजस्थानची बॅटिंग

त्याआधी राजस्थानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 225 धावा केल्या. राजस्थानसाठी चौघांनी दुहेरी आकडा गाठला. राजस्थानसाठी कॅप्टन रियान पराग याने सर्वाधिक धावा केल्या. रियानने 50 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 8 फोरसह 90 धावा केल्या. ध्रुव जुरेल याने 42 धावांचं योगदान दिलं. रवींद्र जडेजा याने 20 धावा केल्या.

स्कोअरकार्ड

डोनोवन फेरेराचा झंझावात

तसेच डोनोवन फेरेरा याने अखेरच्या क्षणी चाबूक खेळ करत फिनिशिंग टच दिला. डोनोवनने 14 बॉलमध्ये 335.71 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 47 रन्स केल्या. डोनोवनने या खेळीत 6 सिक्स आणि 2 फोर लगावले. तर दिल्लीसाठी मिचेल स्टार्क याने तिघांना आऊट केलं. तर कायल जेमीसन, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us