जडेजाने पाहून बॅट फिरवली, कुलदीपनेही धक्का देऊन ढकललं! टीम इंडियाचे खेळाडू भिडले Video

आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात राजस्थान प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात तीन विकेट पडल्यानंतर एक मजेशीर प्रकार पाहायला मिळाला.

जडेजाने पाहून बॅट फिरवली, कुलदीपनेही धक्का देऊन ढकललं! टीम इंडियाचे खेळाडू भिडले Video
जडेजाने पाहून बॅट फिरवली, कुलदीपनेही धक्का देऊन ढकललं, टीम इंडियाचे खेळाडू भिडले Video
Image Credit source: video grab/Twitter
| Updated on: May 01, 2026 | 9:25 PM

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 43व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याने कौल जिंकला. यानंतर त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सची सुरूवात काही काही चांगली झाली नाही. यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद झाले. त्यानंतर कर्णधार रियान परागने ध्रुव जुरेलसोबत डाव सावरला. या दोघांनी 59 चेंडूत 102 धावांची भागीदारी केली. ध्रुव जुरेल 30 चेंडूत 42 धावा करून बाद झाला. 114 धावांवर तीन गडी बाद अशी स्थिती असताना रवींद्र जडेजा मैदानात आला. पण मैदानात येताच त्याने आपला मजेशीर अंदाज दाखवलास रवींद्र जडेजाला बॅट तलवारसारखी फिरवण्याची सवय आहे. मैदानात आल्यानंतर त्याने कुलदीप यादवला पाहिलं आणि त्याच्या तोंडा जवळून बॅट जोरात तलवारसारखी फिरवली.

राजस्थान रॉयल्सच्या रवींद्र जडेजाने अशी कृती केल्यानंतर कुलदीप यादवही मस्तीच्या मूडमध्ये आला. त्याने रवींद्र जडेजाला पकडलं आणि धक्का मारला. कुलदीप यादवने धक्का मारल्यानंतर रवींद्र जडेजाने त्याला काही प्रतिक्रिया दिली नाही. रवींद्र जडेजाने असं दोन वेळा केलं. त्यानंतर रवींद्र जडेजा पंचांकडे गेला. ही मजेशीर कृती सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओखाली मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा हे दोघं भारतीय संघात फिरकीची जबाबदारी सांभाळतात. तसेच या दोघांचं एकमेकांशी चांगलं बाँडिंग आहे. त्यामुळे हा प्रसंग पाहून नेटकरीही मजेशीर प्रतिक्रिया नोंदवत आहे.

रवींद्र जडेजाला पाचव्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. त्याने कर्णधार रियान परागसोबत 28 चेंडूत 53 धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाचं योगदान काही फार राहिलं नाही. रवींद्र जडेजाने 14 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार मारत 20 धावा केल्या. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजी फटका मारताना चुकला आणि आशुतोष शर्माने त्याचा अप्रतिम झेल पकडला. दुसरीकडे, कुलदीप यादवने महागडा स्पेल टाकला. त्याने 4 षटकं टाकत 41 धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळाला नाही. त्याने 10.20 इकोनॉमी रेटने धावा दिल्या.

Follow Us