RR vs RCB Rain : पावसाच्या खोड्यानंतर अखेर सामना सुरु, किती ओव्हर कट? जाणून घ्या

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Rain and Toss Update : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना अनेक विघ्नांनंतर होणार आहे. राजस्थानने आरसीबी विरुद्ध चेजिंग करण्याचं ठरवलंय. पावसामुळे सामन्यातील तब्बल 70 मिनिटांचा खेळ वाया गेला.

RR vs RCB Rain : पावसाच्या खोड्यानंतर अखेर सामना सुरु, किती ओव्हर कट? जाणून घ्या
RR vs Rcb Toss and Playing 11
Image Credit source: IPL X Account
| Updated on: Apr 10, 2026 | 9:14 PM

पावसाच्या विश्रांतीमुळे आणि ग्राउंड स्टाफच्या कठोर मेहनतीनंतर अखेर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 16 व्या सामन्यात विलंबाने का होईना मात्र टॉस झाला. टॉस होण्याची नियमित वेळ ही संध्याकाळी 7 वाजताची आहे. मात्र पावसाने 60 मिनिटं अर्थात 1 तास वाया घालवला. मात्र ग्राउंड स्टाफने घेतलेल्या मेहनतीमुळे रात्री 8 वाजता अखेर टॉस झाला. होम टीम राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध टॉस जिंकला. राजस्थानचा कॅप्टन रजत पाटीदार फिल्डिंगचा निर्णय घेतला. अधिकृत माहितीनुसार टॉसनंतर 15 मिनिटांनी अर्थात 8 वाजून 15 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होणार होती. मात्र पावसाने टॉसनंतर पुन्हा खोडा घातला. टॉसनंतर पुन्हा पावसाची रिपरिप सुरु झाली.

पावसाच्या या संततधारेमुळे आता खेळाला सुरुवात होण्यास आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. सामन्याला सव्वा 8 वाजता सुरुवात झाली असती तर 20 षटकांचा खेळ होणार होता. मात्र आता सामन्याला किता वाजता सुरुवात होणार? याची अपडेट समोर आली आहे. अधिकृत माहितीनुसार, पावसाने पुन्हा विघ्न न घातल्यास 8 वाजून 40 मिनिटांनी खेळाला सुरुवात होईल. अशाप्रकारे टॉसनंतर झालेल्या पावसाने सामन्यातील आणखी 25 मिनिटांचा खेळ वाया घालवला

लाईव्ह स्कोअरकार्ड

प्लेइंग ईलेव्हनमध्ये प्रत्येकी 1-1 बदल

राजस्थान आणि बंगळुरु या दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्रत्येकी 1-1 बदल केला आहे. आरसीबीला नाईलाजाने बदल करावा लागला आहे. जेकब डफी याला बाहेर व्हावं लागलंय. त्याच्या जागी मॅचविनर गोलंदाज जोश हेझलवूड याला संधी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला राजस्थानने वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याला विश्रांती दिली आहे. तुषारच्या जागी ब्रिजेश शर्मा याला संधी दिली आहे.

कोण जिंकणार सामना?

दरम्यान राजस्थान आणि बंगळुरु दोन्ही संघ अजिंक्य आहेत. राजस्थानने 3 तर आरसीबीने 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे कोणता संघ अजिंक्य राहतो हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रियान पराग (कॅप्टन), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा, रवी बिश्नोई आणि ब्रिजेश शर्मा.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : विराट कोहली, फिलिप सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग आणि जोश हेझलवूड.

Follow Us