AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, SRH vs LSG: लखनौ सुपर जायंट्सचा पहिला विजय, हैदराबादला 5 गडी राखून नमवलं

आयपीएल 2026 स्पर्धेच्या दहाव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आमनासामना झाला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 156 धावा केल्या. या धावा लखनौने 19.5 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केल्या.

IPL 2026, SRH vs LSG: लखनौ सुपर जायंट्सचा पहिला विजय, हैदराबादला 5 गडी राखून नमवलं
Image Credit source: LSG Twitter
| Updated on: Apr 05, 2026 | 8:01 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धा आता प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत आहे. आतापर्यंत 10 सामन्यांचा खेळ संपला आहे. दहाव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने आले. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर हा निर्णय सहासी होता असं म्हणायला हरकत नाही. कारण सनरायझर्स हैदराबादकडे आक्रमक फलंदाजांची फौज आहे. त्यात दुपारचा सामना असल्याने दव फॅक्टरचा प्रश्नच नव्हता. अशा स्थितीतही लखनौ सुपर जायंट्सने भेदक गोलंदाजी केली. तसेच सनरायझर्स हैदराबादला 20 षटकात 9 गडी घेऊन 156 धावांवर रोखलं. तसेच विजयासाठी 157 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठणं सोपं होतं. पण तसं झालं नाही. ऋषभ पंतला या विजयासाठी झुंजावं लागलं. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे हा विजय मिळवता आला. यासह लखनौ सुपर जायंट्सने या स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. लखनौ सुपर जायंट्सने 5 गडी राखून विजय मिळवला.

लखनौ सुपर जायंट्सचा डाव

लखनौ सुपर जायंट्सकडून एडन मार्करम आणि मिचेल मार्श यांनी चांगली सुरूवात केली. पहिल्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी केली. मिचेल मार्श 14 धावा करून बाद झाला. त्यानंतर एडन मार्करम आणि ऋषभ पंतने 40 धावांची भागीदारी केली. एडन मार्करम बाद झाल्यानंतर आयुष बदोनी आला. त्याचा खेळ फक्त 12 धावांवर आटोपला. निकोलस पूरन फक्त 1 धावेवर धावचीत झाला. 105 धावा असताना चौथी विकेट पडल्याने दडपण वाढलं होतं. पण ऋषभ पंतने कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी केली. संघ अडचणीत आल्याचं पाहून सावध पण धावांची गती कायम ठेवली.  अब्दुल समद 12 धावांवर खेळताना झेलबाद झाला आणि पुन्हा एकदा दबाव वाढला. पण एका बाजूने ऋषभ पंतने खेळ सुरू ठेवला.  शेवटच्या षटकात विजयासाठी 9 धावांची गरज होती. पहिल्या दोन चेंडूंवर पंतने दोन चौकार मारले आणि विजय सोपा झाला.

सनरायझर्स हैदराबादचा डाव

सनरायझर्स हैदराबादची सुरूवात काही चांगली झाली नाही. अभिषेक शर्मा खातं न खोलता बाद झाला. त्यानंतर ट्रेव्हिस हेडचा खेळ फक्त 7 धावांवर आटोपला. इशान किशन 1 धाव करून तंबूत परतला. लियाम लिव्हिंगस्टोनही फक्त 14 धावा करू शकला. संघ अडचणीत असताना हेनरिक क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डी यांनी डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 63 चेंडूत 116 धावांची भागीदारी केली. हेनरिक क्लासेनने 62, तर नितीश कुमार रेड्डीने 56 धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीमुळे डाव सावरला. त्यानंतर तळाचे फलंदाज काही खास करू शकले नाहीत. हर्ष दुबे पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तर शिवांग कुमार 5 धावा करून तंबूत परतला. लखनौकडून मोहम्मद शमी 2, प्रिन्स यादव 2, आवेश खान 2, दिग्वेश सिंह राठी 1 आणि मणिमरन सिद्धार्थ 1 गडी बाद केला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...