AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, SRH vs PBKS : पंजाब किंग्सने हैदराबादला 6 गडी राखून नमवलं, तिसऱ्या विजयाची नोंद

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 17व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात लढत झाली. पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादल 6 गडी राखून पराभूत केलं. तसेच या स्पर्धेतील तिसऱ्या विजयाची नोंद केली.

IPL 2026, SRH vs PBKS : पंजाब किंग्सने हैदराबादला 6 गडी राखून नमवलं, तिसऱ्या विजयाची नोंद
पंजाब किंग्सने हैदराबादल 6 गडी राखून नमवलं, तिसऱ्या विजयाची नोंदImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 11, 2026 | 7:22 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 17व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांचा आमनासामना झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा पंजाब किंग्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 6 गडी गमवून 219 धावा केल्या. तसेच विजयासाठी 220 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हा न पंजाब किंग्सने 6 गडी राखून पूर्ण केलं. सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांना प्रभावी मारा करण्यात अपयश आलं. खरं तर पावरप्लेमध्येच पंजाब किंग्सने अर्धा सामना जिंकला होता. सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत यासह पंजाब किंग्सने स्पर्धेतील तिसरा विजय मिळवला आहे. कोलकाताविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि एक गुण मिळाला होात.  या विजयासह पंजाब किंग्सच्या खात्यात 7 गुण पडले असून गुणतालिकेत दुसरं स्थान गाठलं आहे. तर राजस्थान रॉयल्स 8 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.

पंजाब किंग्सचा डाव

आयपीएल स्पर्धेतील 17 व्या सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 6.2 षटकात 99 धावांची भागीदारी केली. प्रियांश आर्याने 20 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकार मारत 57 धावा केल्या. तर प्रभसिमरन सिंगने 25 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकार मारत 51 धावा केल्या. तर कूपर कोनोली फक्त 11 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि नेहल वढेरा यांनी डाव सावरला. या दोघांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे पंजाबचा विजयाचा मार्ग सोपा होत गेला.  श्रेयस अय्यरने 24 चेंडूत अर्धशतक ठोकलं आणि संघाला संकटातून बाहेर काढण्यात मोलाचा हातभार लावला.

सनरायझर्स हैदराबादचा डाव

अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिड हेड ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने हैदराबादला आक्रमक सुरूवात करून दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्माने 28 चेंडूत 74 आणि ट्रेव्हिस हेडने 23 चेंडूत 38 धावांची खेळी केली. ही जोडी फुटली आणि धावगतीला ब्रेक बसला. इशान किशन 17 चेंडूत 27 धावा केल्या. हेनरिक क्लासेनने 39 धावा करताना 33 चेंडूंचा सामना केला. त्यामुळे धावगती वाढवण्यात फार काही मदत झाली नाही. अनिकेत वर्माने 18, सलील अरोराने 9 धावा केल्या. तर नितीश कुमार रेड्डीने नाबाद 0 आणि हरिश दुबेने नाबाद 1 धाव केली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...