SRH vs RR : राजस्थानचा हैदराबाद विरुद्ध बॉलिंगचा निर्णय, कोणती सलामी जोडी ठरणार ‘यशस्वी’?
Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Toss and Playing 11 : हैदराबाद टीममध्ये एकसेएक आणि तोडीसतोड फलंदाज आहेत. मात्र हैदराबाद अजूनही चाचपडताना दिसत आहे. त्यामुळे हैदराबादसमोर राजस्थान विरुद्ध कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमताील (IPL 2026) 21 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. राजस्थान आणि हैदराबाद दोन्ही संघांचा हा पाचवा सामना आहे. राजस्थानने रियान पराग याच्या नेतृत्वात अजिंक्य आहे. राजस्थानने अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत करत विजयी चौकार लगावला आहे. तर हैदराबादला 4 पैकी एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे हैदराबाद राजस्थानला पराभूत करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.
राजस्थानचा बॉलिंगचा निर्णय
हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. राजस्थानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन रियान पराग याने हैदराबाद विरुद्ध बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये प्रत्येकी 2-2 बदल केले आहेत. हैदराबाद टीममध्ये एशान मलिंगा आणि प्रफुल हिंगे या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. तर राजस्थान रॉयल्सकडून लुआन-ड्रे प्रिटोरियस आणि तुषार देशपांडे यांना संधी देण्यात आली आहे.
ओपिनिंग जोडीत कडवी झुंज
या सामन्यात दोन्ही संघांच्या सलामी जोडीत कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. ट्रेव्हीस हेड आणि अभिषेक शर्मा या हैदराबादच्या सलामी जोडीने आतापर्यंत अनेकदा टीमला विस्फोटक सुरुवात मिळवून दिली आहे. या दोघांनी पंजाब विरूद्धच्या सामन्यातही हैदराबादला वादळी सुरुवात करुन दिली होती. तर वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या दोघांनी राजस्थानला पहिल्या 3 सामन्यात 50 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली. त्यामुळे या दोघांपैकी कोणत्या संघाची सलामी जोडी यशस्वी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हैदराबाद-राजस्थान लाईव्ह स्कोअरकार्ड
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रेव्हीस हेड, इशान किशन (कॅप्टन आणि विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, शिवांग कुमार, प्रफुल्ल हिंगे आणि एशान मलिंगा.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रियान पराग (कॅप्टन), लुआन-ड्रे प्रिटोरियस, डोनोव्हन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा, रवी बिश्नोई आण तुषार देशपांडे.