AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs RR Live Streaming : हैदराबादसमोर राजस्थानचं आव्हान, सलग पाचवा सामना जिंकण्यापासून रोखणार?

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals IPL 2026 Live Scorecard : राजस्थान रॉयल्सला 19 व्या मोसमात आतापर्यंत 4 संघ रोखण्यात अपयशी ठरले आहत. त्यामुळे हैदराबाद राजस्थानच्या विजयी झंझावाताला ब्रेक लावण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

SRH vs RR Live Streaming : हैदराबादसमोर राजस्थानचं आव्हान, सलग पाचवा सामना जिंकण्यापासून रोखणार?
Yashasvi jaiswal RR vs SRHImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 13, 2026 | 3:20 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) सोमवारी 13 एप्रिलला 2 चॅम्पिन्स संघ आमनेसामने असणार आहेत. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांचा हा या 19 व्या मोसमातील पाचवा सामना असणार आहे. राजस्थानने रियान पराग याच्या नेतृत्वात एकूण आणि सलग 4 सामने जिंकले आहेत. तर इशान किशन त्याच्या नेतृत्वात हैदराबादला 4 पैकी फक्त एकाच सामन्यात विजयी करण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामुळे हैदराबादसमोर राजस्थानचा विजयरथ रोखून विजयी ट्रॅकवर परतण्याचं दुहेरी आव्हान असणार आहे. त्यामुळे आता हैदराबाद कमबॅक करत सामना जिंकणार की राजस्थान सलग पाचवा विजय मिळवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना कधी?

हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना सोमवारी 13 एप्रिलला होणार आहे.

हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना कुठे?

हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद इथे होणार आहे.

हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?

हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे मॅच लाईव्ह पाहता येईल.

दोन्ही संघांची पॉइंट्स टेबलमधील स्थिती

राजस्थान अजिंक्य आहे. राजस्थानने खेळलेल्या चारही सामन्यात विजय मिळवला आहे. राजस्थानच्या खात्यात 8 गुण आहेत. तर राजस्थानचा नेट रनरेट हा +2.055 असा आहे. तर हैदराबादला 4 पैकी एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. हैदराबाद 2 गुणासंह पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहे. हैदराबादचा नेट रनरेट हा -0.024 असा आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

दरम्यान आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत राजस्थान आणि हैदराबाद दोन्ही संघ एकूण 21 वेळा आमनेसामने आले आहेत. हैदराबादने या 21 पैकी 12 सामन्यांमध्ये राजस्थानला पराभवाची धुळ चारली आहे. तर राजस्थानने हैदराबादवर 9 सामन्यांत मात केली आहे. अशात आता 22 व्या सामन्यात दोघांपैकी कोण मैदान मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?