AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धा संपली, वैभव सूर्यवंशी आता मैदानात कधी दिसणार? जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा प्रवास क्वॉलिफायर 2 मध्ये संपला. गुजरात टायटन्सकडून पराभव झाल्याने अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 96 धावांची खेळी केली.

IPL 2026 स्पर्धा संपली, वैभव सूर्यवंशी आता मैदानात कधी दिसणार? जाणून घ्या
IPL 2026 स्पर्धा संपली, वैभव सूर्यवंशी आता मैदानात कधी दिसणार? जाणून घ्याImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 30, 2026 | 6:30 PM
Share

आयपीएल 2026 खऱ्या अर्थाने कोणी गाजवली असेल तर ती 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने… त्याने आपल्या आक्रमक खेळीमुळे दिग्गज गोलंदाजांची धुलाई केली. लहान आहे असं समजणाऱ्यांना त्याने आपल्या फलंदाजीने बरोबर इंगा दाखवला.. पण दुर्दैवाने राजस्थान रॉयल्सचा प्रवास क्वॉलिफायर 2 मध्ये थांबला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 96 धावांची खेळी केली. पण त्या खेळीवर शुबमन गिलचं शतक भारी पडलं. त्यामुळे वैभव सूर्यवंशी फलंदाजी पाहण्याचा योग कधी येणार असा प्रश्न आहे. कारण वैभव सूर्यवंशी आता थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळताना दिसणार आहे. इतकंच काय तर देशांतर्गत सिझनही लांब आहे. पण वैभव सूर्यवंशीच्या चाहत्यांना फार काही वाट पाहावी लागणार नाही. अवघ्या 10 दिवसांनी वैभव सूर्यवंशीची बॅट तळपताना दिसणार आहे. भारत अ संघाकडून श्रीलंका अ संघाविरूद्धच्या सामन्यात खेळताना दिसेल.

तिलक वर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. वैभव सूर्यवंशीला भारत अ संघात जागा मिळाली आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ संघासोबत ट्राय नेशन वनडे मालिकेत खेळणार आहे. भारताचा पहिला सामना 9 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 11 जून रोजी अफगाणिस्तानशी लढत होईल . 15 जून रोजी श्रीलंका अ आणि 17 जून रोजी अफगाणिस्तान अ संघाशी पुन्हा सामना होईल. त्यानंतर 21 जून रोजी अंतिम सामना खेळला जाईल.

श्रीलंका दौऱ्यात वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्या ओपनिंग करतील. दोघांनी यापूर्वी आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेत भारत अ संघासाठी ओपनिंग केली होती. वैभव सूर्यवंशीनेही आपल्या आक्रमक खेळीने लक्ष वधू घेतलं आहे. त्यामुळे या स्फोटक जोडीचा खेळ पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.

आयपीएल पर्वात वैभवची कामगिरी

आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने 16 सामने खेळले. या स्पर्धेत त्याने 48.50 च्या सरासरीने आणि 776 धावा केल्या आहे. आयपीएल पर्वातील ही सर्वाधिक धावसंख्या आहे. तसेच अशी कामगिरी करमारा पहिला अनकॅप्ड खेळाडू आहे. तसेच त्याच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे. जर अंतिम सामन्यात शुबमन गिल आणि साई सुदर्शन धावा करू शकले नाही तर ऑरेंज कॅपचा मानकरी हा वैभव सूर्यवंशी असेल.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे… पण गुंड सांभाळायचे बंद करा, मनोज जरांगे यांचे मुंडेंवर गंभीर आरोप.

फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे… पण गुंड सांभाळायचे बंद करा, मनोज जरांगे यांचे मुंडेंवर गंभीर आरोप

मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग.

मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग

खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार.

खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार

Garry Sobers: जर्मनीच्या सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं! सोबर्स यांच्या 5 गोष्टी.

Garry Sobers: जर्मनीच्या सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं! सोबर्स यांच्या 5 गोष्टी

मेक्सिकोमध्ये 7.3 तीव्रतेचा भीषण भूकंप; नागरिक भयभीत; नव्या संकटाचा इशारा.

मेक्सिकोमध्ये 7.3 तीव्रतेचा भीषण भूकंप; नागरिक भयभीत; नव्या संकटाचा इशारा

मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत रात्री उशीरा बिघाड, कर्जतकडे जाणाऱ्या लोकल २० ते २५ मिनिटे उशीराने...

मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत रात्री उशीरा बिघाड, कर्जतकडे जाणाऱ्या लोकल २० ते २५ मिनिटे उशीराने..