IPL होऊ दे, मग घेऊन जा रे भावा, वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचे पक्का प्रॉमिस; Viral Video पाहून हसू नाही आवरणार

Vaibhav Suryavanshi Promise to Jitesh Sharma: दमदार खेळीमुळे वैभव सूर्यवंशी विरोधी संघातील खेळांडूच्याही गळ्यातील ताईत झाला आहे. कधी काळी हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांच्या हॉकी स्टिकची अनेक देशांनी मागणी केली होती. तशीच वैभव सूर्यवंशीच्या बॅटची मागणी होत आहे.

IPL होऊ दे, मग घेऊन जा रे भावा, वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचे पक्का प्रॉमिस; Viral Video पाहून हसू नाही आवरणार
वैभव सूर्यवंशी
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 10, 2026 | 3:23 PM

Vaibhav Suryavanshi Promise to Jitesh Sharma: आयपीएल 2026 मध्ये 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने जी कमाल दाखवली, त्यामुळे सर्वच जण अचंबित झाले आहेत. वैभवची जादू संपूर्ण आयपीएलवर दिसून आली आहे. विरोधी संघातील खेळाडूही त्याचे कौतुक करत आहेत. त्याने लवकर भारतीय संघात खेळावे यासाठी अनेक जण शिफारस करत आहेत. त्याने मागील आयपीएल 2025 ही गाजवली होती. आज, शुक्रवारी RCB विरुद्ध RR हे संघ भिडणार आहे. त्यात वैभवची फलंदाजी पाहण्यासाठी संपूर्ण देश टीव्हीसमोर आणि बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर मैदानावर हजर असेल. या दरम्यान वैभव सूर्यवंशी आणि आरसीबीचा यष्टीरक्षक जितेश शर्मा यांचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वैभव सध्या 15 वर्षांचा आहे. त्याला संघात गोलू, लल्ला अशा नावाने ओळखले जाते. तर मैदानावर शर्मा आणि सूर्यवंशींचे हितगुज चांगलेच गाजले आहे.

आयपीएलनंतर देईल बॅट

वैभव सूर्यवंशी मैदानात आल्यावर दणादण धावा काढतो. त्याची बॅट चांगली तळपते. त्याची बॅट कोणती आहे याविषयी सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता आहे. सरावादरम्यान वैभवच्या बॅटवर जितेश शर्माची नजर खिळलेली दिसते आणि तो आताच ही बॅटची मागणी करतो. प्रत्येक सामन्यात तो ही बॅट घेऊन उतरतो आणि धुवांधार बॅटिंग करतो. या व्हिडिओत वैभव जितेशला म्हणतो की तुम्ही माझीच बॅट का मागत आहात, इतरांकडे तर तुम्ही बॅट मागितली नाही. तेव्हा जितेश म्हणतो की मी इतर कुणालाच बॅट मागितली नाही. तेव्हा वैभव सूर्यवंशी म्हणतो की, तुम्ही तर मागेच लागला आहात, मी तुम्हाला आयपीएल झाल्यानंतर ही बॅट देईल. आता तर ती देण्याचा प्रश्नच नाही. आता तुम्हाला बॅट देण्याची संधीच नाही. हा गंमतीशीर प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

वैभव सूर्यवंशी जबरदस्त फॉर्ममध्ये

आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशी 248 ची स्ट्राईक रेटने तुफान फटकेबाजी केली आहे. 3 सामन्यात 3 डावात त्याने एक अर्धशतक लावले आहे. वैभवने 40.67 च्या सरासरीसह 122 धावा केल्या आहेत. 17 चेंडूत 52 धावा चोपत त्याने व्यक्तिगत पातळीवर दमदार कामगिरी बजावली आहे. चेन्नई सुपर किंग्सविरोधात त्याने ही खेळी खेळली होती. त्यानंतर गुजरात टायटन्सविरोधात त्याने 18 चेंडूत 31 आणि मुंबई इंडियन्सविरोधात 14 चेंडूत 39 धावा चोपल्या होत्या. हार्दिक पांड्याने त्याची फलंदाजी पाहून त्याचे कौतुक केले. त्याचवेळी त्याने त्याची बॅटही चेक केली. तेव्हा प्रेक्षकांमध्ये एकचा हश्या पिकला होता.

Follow Us