AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs RR : कॅप्टन इशान किशनचा तडाखा, राजस्थानसमोर 217 रन्सचं टार्गेट, हैदराबाद सलग पाचव्या विजयापासून रोखणार?

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals 1st Innings : सनरायजर्स हैदराबादने पुन्हा एकदा 19 व्या मोसमात (IPL 2026) द्विशतक झळकावलं आहे. हैदराबादने राजीव गांधी स्टेडियमध्ये राजस्थानसमोर 217 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे.

SRH vs RR : कॅप्टन इशान किशनचा तडाखा, राजस्थानसमोर 217 रन्सचं टार्गेट, हैदराबाद सलग पाचव्या विजयापासून रोखणार?
Ishan kishan SRH vs RRImage Credit source: Bcci
| Updated on: Apr 13, 2026 | 10:19 PM
Share

सनरायजर्स हैदराबादने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 21 व्या सामन्यात सलग 4 सामने जिंकणाऱ्या राजस्थान रॉयल्ससमोर 217 धावांचं आव्हान ठेवलं आहे. एसआरएचने कॅप्टन इशान किशन याच्या वादळी खेळीच्या जोरावर हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये 20 षटकांत 6 विकेट्स गमावून 216 रन्स केल्या. इशानने हैदराबादसाठी सर्वाधिक धावा केल्या. तसेच हेन्रिक क्लासेन याने 150 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. तर नितीश कुमार रेड्डी आणि सलील अरोरा या दोघांनी अखेरच्या क्षणी महत्त्वपूर्ण खेळी करुन हैदराबादला 200 पार पोहचवण्यात प्रमुख योगदान दिलं. त्यामुळे आता हैदराबाद घरच्या मैदानात सामना जिंकणार की राजस्थान विजयी पंच लगावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रफुल्ल हिंगे चमकला, राजस्थानला 2 ओव्हरमध्ये 4 झटके

हैदराबादच्या गोलंदाजांनी 217 रन्सचा पाठलाग करणाऱ्या राजस्थान रॉयल्सला पहिल्याच 2 ओव्हरमध्ये बॅकफुटवर टाकलं. हैदराबादने पहिल्या 2 ओव्हरमध्ये 4 झटके दिले. विदर्भाच्या प्रफुल हिंगे याने त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट्स मिळवल्या. तर साकीब हुसेन याने 1 विकेट मिळवली. त्यामुळे राजस्थानची 4 आऊट 4 रन्स अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे राजस्थान इथून कमबॅक करत पाचवा विजय मिळवण्यात यशस्वी ठरणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

सनरायजर्स हैदराबादची बॅटिंग

राजस्थानने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. जोफ्रा आर्चरने अभिषेक शर्मा याला पहिल्याच बॉलवर आऊट करत हैदराबादला मोठा झटका दिला. ट्रेव्हीस हेड याने टी 20 मध्ये वनडे स्टाईल 100 च्या स्ट्राईक रेटने 18 रन्स केल्या. त्यानंतर इशान किशन आणि हेन्रिक क्लासेन या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी फक्त 39 बॉलमध्ये 88 रन्सची पार्टनरशीप केली. इशान किशन याला शतक करण्याची संधी होती. मात्र संदीप शर्मा याने इशानला आऊट केलं. इशान नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला. इशानने 44 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 8 फोरसह 91 रन्स केल्या. हेनरिक क्लासेन याने 26 चेंडूत 40 धावा जोडल्या.

लाईव्ह स्कोअरकार्ड

तसेच नितीश कुमार रेड्डी आणि सलील अरोरा या दोघांनी निर्णायक खेळी साकारली. नितीशने 13 बॉलमध्ये 28 रन्स केल्या. तर सलीलने 13 चेंडूत नाबाद 24 धावा केल्या. राजस्थानसाठी जोफ्रा आर्चर याने 2 विकेट्स मिळवल्या. तर संदीप शर्मा, तुषार देशपांडे आणि रियान पराग या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मोठी खळबळ! PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींचं ठिय्या आंदोलन,
LIVE Video | PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींचं ठिय्या आंदोलन, प्रियांका गांधी तर थेट मांडी घालूनच बसल्या
सत्तेचा माज भाजपच्या डोक्यात गेलाय? ठाकरे यांचा सरकारला संतप्त सवाल
Amit Thackeray | सत्तेचा माज भाजपच्या डोक्यात गेलाय? अमित ठाकरे यांचा सरकारला संतप्त सवाल
राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?.

राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?

IMD weather update : राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे.

IMD weather update : राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जमा व्हा, राहुल गांधी यांचं देशवासियांना आवाहन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जमा व्हा, राहुल गांधी यांचं देशवासियांना आवाहन

या देशात एका समोशाच्या किंमतीत मिळते चक्क साडे सहा लिटर पेट्रोल, डिझेलचे दर तर इतके कवडीमोल….

या देशात एका समोशाच्या किंमतीत मिळते चक्क साडे सहा लिटर पेट्रोल, डिझेलचे दर तर इतके कवडीमोल…

Bfची हत्या केली, मृतदेह गोणीत भरून बाथरुमचा नळ चालू ठेवला, पण एका व्हॉइस मेसेजने गेम केला.

Bfची हत्या केली, मृतदेह गोणीत भरून बाथरुमचा नळ चालू ठेवला, पण एका व्हॉइस मेसेजने गेम केला

मोठी बातमी! शरद पवार जंतर मंतरवर, अभिजित दिपकेंची घेतली भेट, पहिली प्रतिक्रिया काय?.

मोठी बातमी! शरद पवार जंतर मंतरवर, अभिजित दिपकेंची घेतली भेट, पहिली प्रतिक्रिया काय?