SRH vs MI Toss : मुंबई इंडियन्सकडून आफ्रिकेच्या तुफानाचा प्लेइंग 11 मध्ये समावेश, हैदराबादला पाडणार खिंडार?

SRH vs MI Toss : मुंबई इंडियन्स संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज पहिला विजय मिळवण्यासाठी मुंबई संघाने एका तगड्या खेळाडूला संधी दिली आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

SRH vs MI Toss : मुंबई इंडियन्सकडून आफ्रिकेच्या तुफानाचा प्लेइंग 11 मध्ये समावेश, हैदराबादला पाडणार खिंडार?
| Updated on: Mar 27, 2024 | 7:40 PM

आयपीएलमधील आठवा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्समध्ये होणार आहे. हैदराबाद संघाच्या होम ग्राऊंडवर हा सामना होत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घतला आहे. सनरायझर्स हैदराबादने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल आहे. तर मुंबईनेही बदल केला असून एका युवा खेळाडूला संधी दिली आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

हैदराबादच्या संघामध्ये नटराजन जखमी असून  त्याच्या जागी जयदेव उनाडकटला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. ट्रॅव्हिस हेड याचीही निवड झाली आहे.  तर मुंबईमध्ये ल्यूक वुड याच्या जागी क्वेना मफाका याला संधी देण्यात आली आहे. क्वेना मफाका लेफ्ट आर्म फास्ट बॉलर असून अंडर-19 वर्ल्ड कप 2024 मध्ये त्याने घातक गोलंदाजी केली होती. दक्षिण आफ्रिकेचा ज्युनियर कागिसो रबाडा म्हणूनही क्वेना मफाका ओळखला जातो.

क्वेना मफाका आयपीएलमधील सर्वात तरूण अनकॅप तिसरा खेळाडू ठरला आहे.  अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये चांगल्या चांगल्यांच्या दांड्या त्याने गुल केल्या होत्या. या कामगिरीमुळेच त्याला लिलावामध्ये मुंबईने खरेदी करत आपल्या ताफ्यात सामील केलं. अंडर-19 वर्ल्ड कपला त्याने अवघ्या सहा सामन्यांमध्ये 21 विकेट घेतल्या होत्या. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता.

दरम्यान, आजच्या सामन्यात क्वेना मफाका कसा डेब्यू करतो याकडे सर्वांचं  लक्ष लागलं आहे. जगातील सर्वात लोकप्रिय असणाऱ्या टी-20 लीगमध्ये मफाका छाप पाडण्यात यशस्वी ठरतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (WK), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (WK), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, शम्स मुलानी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका