AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Delhi Capitals Team 2021 | गत मोसमात उपविजेत्या ठरलेल्या दिल्लीच्या गोटात तडाखेबाज फलंदाज, अशी आहे टीम

आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीच्या लिलवातून (IPL Auction 2021) दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) एकूण 8 खेळाडू खरेदी केले आहेत.

IPL Delhi Capitals Team 2021 | गत मोसमात उपविजेत्या ठरलेल्या दिल्लीच्या गोटात तडाखेबाज फलंदाज, अशी आहे टीम
| Updated on: Feb 19, 2021 | 12:32 PM
Share

चेन्नई | आयपीएलच्या आगमी 14 व्या पर्वासाठी आता काही अवघे दिवस उरले आहेत. या मोसमासाठीचा (IPL Auction 2021) लिलाव 18 फेब्रुवारीला चेन्नईत पार पडला. या लिलावात अनेक खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लावण्यात आली. ख्रिस मॉरिस हा या मोसमातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. या लिलावातून गत मोसमातील उपविजेता संघ ठरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) एकूण 8 खेळाडूंना खरेदी केलं. (ipl auction 2021 delhi capitals team see full players list 2021)

यामध्ये दिल्लीने तडाखेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथलाही (Steve Smith) आपल्या ताफ्यात घेतलं. या 8 पैकी 5 खेळाडू हे भारतीय तर 3 परदेशी खेळाडू आहेत. दिल्लीने इंग्लंडच्या टॉम करनसाठी (Tom Curran) सर्वाधिक रक्कम मोजली. टॉमसाठी दिल्लीने 5 कोटी 25 लाख खर्च केले. तर याशिवाय राजस्थान रॉयल्सने रिलीज केलेल्या तडाखेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथलाही दिल्लीने आपल्या गोटात घेतलं. स्टीव्हला त्याच्या बेस प्राईजपेक्षा फ्क्त 20 लाख जास्त मिळाले. दिल्ली फ्रँचायजीने स्मिथला 2 कोटी 20 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं. स्मिथला राजस्थान रॉयल्सने रिलीज (करारमुक्त) केलं होतं.

दिल्लीने खरेदी केलेले खेळाडू

टॉम करन- 5.25 कोटी रुपये

स्टीव्ह स्मिथ- 2.20 कोटी रुपये

उमेश यादव- 1 कोटी रुपये

रिपल पटेल- 20 लाख रुपये

विष्णु विनोद- 20 लाख रुपये

लुकमान मेरिवाला- 20 लाख रुपये

एम सिद्धार्थ- 20 लाख रुपये

सॅम बिलिंग्स- 2 कोटी रुपये

दिल्लीने कायम राखलेले खेळाडू : श्रेयस अय्यर, खगिसो रबाडा, मार्कस स्‍टोइनिस, इशांत शर्मा, अजिंक्‍य रहाणे, ख्रिस वोक्‍स, रवीचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, प्रवीण दुबे, प्रथ्‍वी शॉ, ललित यादव, एनरिक नॉर्किया, आवेश खान, अक्षर पटेल, ऋषभ पंत आणि अमित मिश्रा.

दिल्लीची गत मोसमात अंतिम फेरीत धडक

दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या 13 व्या मोसमात अंतिम सामन्यात धडक मारली होती. मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीने ही कामगिरी केली होती. दिल्लीने अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सला कडवे आव्हान दिले होते. पण दिल्लीला विजेतेपद पटकावता आले नव्हते. त्यामुळे यावेळेस दिल्लीची विजेतेपद पटकावण्याचे लक्ष्य असणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL Rajasthan Royals Team 2021 | ख्रिस मॉरिसकडून रेकॉर्ड ब्रेक, विराटचा ‘हा’ खेळाडूही ताफ्यात, पाहा राजस्थानची टीम

IPL Mumbai Indians Team 2021 | वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूसह अनेक अनुभवी खेळाडू, पाहा मुंबई इंडियन्सची टीम

IPL Auction 2021 Highlights | ख्रिस मॉरिसला सर्वात मोठी रक्कम, एकूण 57 खेळाडूंचा लिलाव

(ipl auction 2021 delhi capitals team see full players list 2021)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.