AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chennai Super Kings | चेन्नईने आयपीएल 2023 फायनल जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सचं ट्विट

CSK IPL 2023 Winner | महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स टीमने गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईने या विजयासह मोठा रेकॉर्डची बरोबरी केली.

Chennai Super Kings | चेन्नईने आयपीएल 2023 फायनल जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सचं ट्विट
आयपीएल 16 वा मोसम नुकताच पार पडला. चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सवर शेवटच्या बॉलवर सनसनाटी विजय मिळवला. यंदा जिओ सिनेमावर मोफत आयपीएल सामने पाहायला मिळाल्याने पाहणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती.
| Updated on: May 30, 2023 | 5:59 AM
Share

अहमदाबाद | चेन्नई सुपर किंग्स टीमने गुजरात टायटन्स संघाला त्यांच्याच होम ग्राउंड नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पराभूत केलं. चेन्नईने गुजरात टायटन्सवर आयपीएल 16 व्या मोसमातील अंतिम फेरीत 5 विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईला डकवर्थ लुईस नियमानुसार 15 ओव्हरमध्ये 171 धावांचं आव्हान मिळालं. चेन्नईने हे आव्हान शेवटच्या चेंडूवर 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. चेन्नईला शेवटच्या 2 बॉलमध्ये 10 धावांची गरज होती. तेव्हा रविंद्र जडेजाने मोहित शर्माच्या बॉलिंगवर सिक्स आणि फोर ठोकून चेन्नईला विजयी केलं. रविंद्र जडेजाने गुजरातच्या तोंडातील घास हिसकावून घेतला. चेन्नईचा हा महेंद्रसिंह धोनीच्या नेतृ्वातील पाचवा आयपीएल ट्रॉफी विजय ठरला.

चेन्नईने या विजयासह मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी केली. आता चेन्नई सर्वाधिक 5 संयुक्तपणे आयपीएल ट्रॉफी जिंकणारी टीम ठरली आहे. चेन्नईने 2010, 2011, 2018, 2021 आणि आता 2023 अशा एकूण 5 वेळा हा कारनामा केलाय. तर मुंबई इंडियन्स टीमने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या वर्षात आयपीएल फायनलमध्ये विजय मिळवला आहे.

चेन्नईने विक्रमाची बरोबरी करताच मुंबई इंडियन्सने चेन्नईसाठी एक ट्विट केलंय. पलटणने अवघ्या 4 शब्दांचं हे ट्विट केलंय. या ट्विटद्वारे मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचं या शानदार विजयासाठी अभिनंदन केलंय. मुंबईकडून चेन्नईचं कौतुकं करणारं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालंय.

पलटणकडून चेन्नईचं अभिनंदन

दरम्यान मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांनीही ट्विट केलंय. राजू पाटील याने आपल्या ट्विटमध्ये जडेजाचं नाव घेत गुजरातसाठी खोचक ट्विट केलंय. तसेच चेन्नईचे अभिनंदनही केलंय. “गुजरातला गुजरातमध्ये गुजराती भारी पडला ! ……#जडेजा. चेन्नई सुपर किंगचे अभिनंदन ! #हे_राम #IPL_2023 #CSK”, असं ट्विट राजू पाटील यांनी केलंय.

चेन्नई सुपर किंग्सचं अभिनंदन

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...