GT vs RR: ‘या’ स्टेप्स फॉलो करुन बुक करा IPL 2022 फायनलचं तिकीट

GT vs RR: 'या' स्टेप्स फॉलो करुन बुक करा IPL 2022 फायनलचं तिकीट
गुजरात विरुद्ध राजस्थान सामना
Image Credit source: social

74 पैकी 73 सामने झाले असून फक्त आता एक फायनलची लढत बाकी आहे. गुजरातच्या टीमने या सीजनमधून आयपीएलमध्ये डेब्यु केला. पहिल्याच सीजनमध्ये त्यांनी थेट फायनल गाठली.

दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 28, 2022 | 5:08 PM

मुंबई: इंडियन प्रिमीयर लीगच्या (IPL) 15 व्या सीजनमधील फायनलचे दोन संघ ठरले आहेत. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) हे दोन संघ आमने-सामने आहेत. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) त्यांच्यात अंतिम लढत होईल. दोन महिन्यापेक्षा जास्त दिवस आयपीएलचा हा हंगाम चालला. एकूण 10 टीम्स या सीजनमध्ये होत्या. 74 पैकी 73 सामने झाले असून फक्त आता एक फायनलची लढत बाकी आहे. गुजरातच्या टीमने या सीजनमधून आयपीएलमध्ये डेब्यु केला. पहिल्याच सीजनमध्ये त्यांनी थेट फायनल गाठली. फायनलची मॅच असली, तरी होम ग्राऊंडवर गुजरातचा हा पहिला सामना आहे. मागच्या 15 सीजनमध्ये राजस्थानचा संघ दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचला आहे. याआधी उद्घाटनाच्या पहिल्याच सीजनमध्ये राजस्थानच्या टीमने आयपीएलचं पहिलं विजेतेपद मिळवलं होतं. चालू मोसमात दोन्ही टीम्स दोनवेळा आमने-सामने आल्या. दोन्हीवेळा गुजरातच्या टीमने बाजी मारली.

बुक माय शो वरुन तिकीट बुक करा

रविवारी होणाऱ्या आयपीएल 2022 फायनलची तुम्ही बुक माय शो वरुन तिकीट विकत घेऊ शकता. तुम्ही त्यांच्या वेबसाइटवर किंवा APP च्या माध्यमातून तिकीट बुक करु शकता. तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला स्पोटर्स सेक्शनमध्ये जावं लागेल. तिथे जाऊन तुम्हाला शहर म्हणजे सामन्याचं ठिकाण टाकावं लागेल.

कशी तिकीट बुक करालं?

बुक माय शो च्या अहमदाबाद सेक्शनमध्ये आधी स्पोर्ट्स त्यानंतर क्रिकेट सेक्शनवर क्लिक करावं लागेल. तिथे तुम्हाला टाटा आयपीएल 2022 फायनल दिसेल. कॉम्प्युटर स्क्रीनच्या उजव्या बाजूला बुकच्या ऑप्शनवर क्लिक करा. विचारलेली माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही उपलब्धतेनुसार, तुमची सीट बुक करु शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचा इमेल आणि कॉन्टॅक्ट नंबर द्यावा लागेल.

पुढच्या काही सोप्या स्टेप्समध्ये तुम्हाला ऑनलाइन व्यवहार पूर्ण करावा लागेल. आयपीएल फायनलचं तिकीट बुक करण्यासाठी, बुक माय शो वर सहज जाण्यासाठी तुम्ही खाली क्लिक करु शकता

आयपीएल 2022 अंतिम सामना (मे 29) – अहमदाबाद

आयपीएल 2022 ची काही तिकीटं सुरुवातीला विकली गेली आहेत. गुजरात क्रिकेट संघटनेने काही अतिरिक्त तिकीटांची व्यवस्था केली आहे. 2 हजार ते अडीज हजार दरम्यान तिकीटांची किंमत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें