IPL 2026 Orange Cap Holder : वैभव सूर्यवंशीला झिरोवर आऊट झाल्यानंतर मोठा झटका, ऑरेंज कॅप गमावली

IPL 2026 Orange Cap Holder: वैभव सूर्यवंशी फक्त एका सामन्यात फ्लॉप झाल्याने त्याला मोठा झटका लागला आहे. वैभवला ऑरेंज कॅप गमवावी लागली आहे. तसेच वैभवला एकाच संघाच्या 2 फलंदाजींनी मागे टाकलं आहे.

IPL 2026 Orange Cap Holder : वैभव सूर्यवंशीला झिरोवर आऊट झाल्यानंतर मोठा झटका, ऑरेंज कॅप गमावली
Vaibhav Sooryavanshi Rajasthan Royals
Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 14, 2026 | 6:58 PM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) प्रत्येक सामन्यानंतर ऑरेंज कॅपसाठी चुरस वाढताना पाहायला मिळत आहे. स्पर्धेतील 20 व्या सामन्यापर्यंत ऑरेंज कॅप युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्याकडे होती. मात्र या सामन्यादरम्यान वैभवला ऑरेंज कॅप गमवावी लागली. स्पर्धेत 21 व्या सामन्यात 13 एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. या सामन्यात वैभवला मोठी खेळी करुन ऑरेंज कॅप पुन्हा मिळवण्याची संधी होती. मात्र हैदराबादचा वेगवान गोलंदाज प्रुफल हिंगे याने वैभवला झिरोवर आऊट केलं. त्यामुळे वैभव पुन्हा ऑरेंज कॅप मिळवण्यात अपयशी ठरला.

राजस्थानने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कॅप्टन इशान किशन याने 91 हेन्रिक क्लासेन याने 40 धावा केल्या. इशानचं शतक अवघ्या 9 धावांसाठी हुकलं. मात्र इशानने दुसऱ्या स्थानी झेप घेतली. तर क्लासेनने ऑरेंज कॅप पटकावली. त्यामुळे वैभव सूर्यवंशी याची सामन्यातील पहिल्या डावांनतर ऑरेंज कॅप यादीत तिसऱ्या स्थानी घसरण झाली. मात्र वैभवला 25 धावा करुन पुन्हा ऑरेंज कॅप मिळवण्याची संधी होती. प्रफुल हिंगे याने वैभवचा करेक्ट कार्यक्रम केला. प्रफुलने वैभवला भोपळाही फोडून दिला नाही.

क्लासेनच्या डोक्यावर ऑरेंज कॅप

क्लासेन सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. क्लासेनने राजस्थान विरुद्ध 26 चेंडूत 40 धावांची खेळी साकारली. क्लासेनने या 40 पैकी 22 धावा या चौकार-षटकारांच्या मदतीने केल्या. क्लासेनने या खेळीत 3 षटकार आणि 1 चौकार लगावला. अशाप्रकारे क्लासेनने 5 सामन्यांमध्ये 224 धावा केल्या आहेत.

कॅप्टन इशान दुसऱ्या स्थानी

इशानला राजस्थान विरुद्ध शतक करण्याची संधी होती. मात्र इशान शतक करण्यापासून फक्त 9 धावांनी दूर राहिला. इशानने 44 चेंडूत 91 रन्सची खेळी केली. इशानने या दरम्यान 6 षटकार आणि 8 चौकार लगावले. इशानच्या नावावर 5 सामन्यांत आता एकूण 213 धावा आहेत. त्यामुळे वैभवची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

दरम्यान वैभवने 5 सामन्यांत 200 धावा केल्या आहेत. वैभवने या दरम्यान 40 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. क्लासेन, इशान आणि वैभव या तिघांनी प्रत्येकी 200 धावा केल्या आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कॅप्टन रजत पाटीदार चौथ्या तर राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल पाचव्या स्थानी आहे. रजतने 4 सामन्यांत 195 धावा केल्या आहेत. तर यशस्वीच्या नावावर 5 सामन्यांमध्ये 184 धावा आहेत.

Follow Us