IPL 2022 Points Table: दिल्लीचा विजय, कोलकाताचा पराभव, पॉइंटस टेबलमध्येही समीकरण बदललं, कसं ते समजून घ्या

| Updated on: Apr 29, 2022 | 8:43 AM

IPL 2022 Points Table: दिल्लीला विजयासाठी फक्त 147 धावांचं टार्गेट मिळालं होतं. पण त्यांना सुद्धा अडचणीचा सामना करावा लागला. अखेर 19 व्या षटकात रोव्हमॅन पॉवेलने षटकार खेचून दिल्ली कॅपिटल्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

IPL 2022 Points Table: दिल्लीचा विजय, कोलकाताचा पराभव, पॉइंटस टेबलमध्येही समीकरण बदललं, कसं ते समजून घ्या
Rishabh pant-Ricky ponting
Image Credit source: BCCI
Follow us on

मुंबई: दमदार प्रदर्शनासह गुजरात टायटन्सचा संघ आयपीएल पॉइंटस टेबलमध्ये (IPL points Table) अव्वल स्थानावर आहे. पण प्लेऑफमध्ये दाखल होण्यासाठी अन्य संघांमध्ये चुरशीचा सामना सुरु आहे. गुरुवारी आयपीएलमधला 41 वा सामना खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या सीजनमध्ये कोलकाता नाइट राडयर्सला (DC vs KKR) दुसऱ्यांदा नमवलं. या विजयासह दिल्लीच्या संघाची पॉइंटस टेबलमध्ये स्थिती थोडी सुधारली आहे. कोलकातावरील विजयासह दिल्लीचे पॉइंटस टेबलमध्ये आठ गुण झाले आहेत. ते सहाव्या स्थानावर आहेत. सलग पाचव्या पराभवासह केकेआरची स्थिती आणखी खराब झाली आहे. केकेआरकडून खेळणारा कुलदीप यादव (Kuldeep yadav) आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. कालच्या सामन्यात कोलकाताच्या पराभवात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. तीन ओव्हर्समध्ये 14 रन्स देत त्याने चार विकेट घेतल्या. कोलकाताच कबंरड मोडून टाकलं.

दिल्लीला विजयासाठी फक्त 147 धावांचं टार्गेट मिळालं होतं. पण त्यांना सुद्धा अडचणीचा सामना करावा लागला. अखेर 19 व्या षटकात रोव्हमॅन पॉवेलने षटकार खेचून दिल्ली कॅपिटल्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

प्लेऑफच्या दिशेने दिल्लीचं महत्त्वाचं पाऊल

या विजयासह दिल्लीचे आठ सामन्यात चार विजयासह आठ पॉइंटस झाले आहेत. त्यांनी सातव्या स्थानावरुन एक पाऊल पुढे टाकलं आहे. पंजाब किंग्सला मागे सोडून दिल्लीचा संघ सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. दिल्लीसाठी एक चांगली बाब म्हणजे त्यांचा नेट रनरेट चांगला आहे. म्हणजे अजून एक विजय मिळवल्यास, समान पॉइंटस असलेल्या संघांपेक्षा ते अजून वरच्या पायरीवर जातील. या विजयामुळे दिल्लीच्या प्लेऑफच्या आशा कायम आहेत. त्यांना उर्वरित सहा पैकी 4 सामने जिंकावेच लागतील. 16 पॉइंटस मिळाल्यास प्लेऑफमध्ये स्थान निश्चित होते.

IPL पॉइंट्स टेबल

संघ सामने जय पराजय पॉइंट्स नेट रन रेट
गुजरात टायटन्स

14104200.316
राजस्थान रॉयल्स
1495180.298
लखनौ सुपर जायंट्स1495180.251
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
148616-0.253
दिल्ली कॅपिटल्स 1477140.204
पंजाब किंग्स 1477140.126
कोलकाता नाइट रायडर्स1468120.146
सनरायजर्स हैदराबाद 146812-0.379
चेन्नई सुपर किंग्स 144108-0.203
मुंबई इंडियन्स144108-0.506

कोलकाताची हालत खराब

सलग पाचव्या पराभवामुळे कोलकाताची स्थिती आणखी खराब झालीय. 9 पैकी सहा सामन्यात त्यांचा पराभव झालाय. फक्त तीन मॅचमध्ये विजय मिळाला आहे. टुर्नामेंटच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये पहिल्या स्थानावर असलेला हा संघ आता आठव्या नंबरवर आहे. त्यांच्याकडे फक्त सहा पॉइंटस असून नेट रनरेटही पडलेला आहे. कोलकाताला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित पाच सामने जिंकावेच लागतील.