IPL 2024 Points Table : दिल्ली कॅपिटल्सचा चेन्नई सुपर किंग्सला दणका, गुजरातने हैदराबादचं गणित बिघडवलं
आयपीएल स्पर्धेतील एकूण 14 सामने संपले आहेत. रविवारी डबल हेडर सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यातील निकालानंतर गुणतालिकेवर आपसुक बदल झाला आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यानेही फरक पडला आहे.

आयपीएलच्या 13 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सचा धावांनी पराभव केला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर विजयासाठी 192 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान गाठताना चेन्नई सुपर किंग्सची दमछाक झाली. चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू झटपट बाद झाले. त्यामुळे संघावर दडपण वाढत गेलं. महेंद्रसिंह धोनीने शेवटच्या षटकात काही फटकेबाजी केली. मात्र संघाला विजय मिळवून देता आला नाही. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 6 गडी गमवून 171 धावा केल्या. तसेच दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईचा 20 धावांनी पराभव केला. या दिल्लीने या विजयासह गुणतालिकेत उलथापालथ केली आहे. चेन्नईला आपलं अव्वल स्थान गमवावं लागलं आहे.
सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 8 गडी गमवून 162 धावा केल्या. तसेच विजयासाठी 163 धावांचं आव्हान ठेवलं. गुजरात टायटन्सने 19.1 षटकात 3 गडी गमवून विजयी धावा पूर्ण केल्या. गुजरातचा या स्पर्धेतील दुसरा विजय आहे. तर सनरायझर्स हैदराबादला तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्सच्या पारड्यात दोन गुणांची भर पडल्याने गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. तर सनरायझर्स हैदराबादची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.
| संघ | सामने | विजय | पराजय | नेट रनरेट | गुण |
|---|---|---|---|---|---|
| राजस्थान रॉयल्स | 3 | 3 | 0 | +1.249 | 6 |
| कोलकाता नाईट रायडर्स | 2 | 2 | 0 | +1.047 | 4 |
| चेन्नई सुपर किंग्स | 3 | 2 | 1 | 0.976 | 4 |
| गुजरात टायटन्स | 3 | 2 | 1 | -0.738 | 4 |
| सनरायझर्स हैदराबाद | 3 | 1 | 2 | +0.204 | 2 |
| लखनऊ सुपर जायंट्स | 2 | 1 | 1 | 0.025 | 2 |
| दिल्ली कॅपिटल्स | 2 | 1 | 2 | -0.016 | 2 |
| पंजाब किंग्स | 3 | 1 | 2 | 0.337 | 2 |
| रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | 3 | 1 | 2 | -0.711 | 2 |
| मुंबई इंडियन्स | 3 | 0 | 3 | -1.423 | 0 |
कोलकाता नाईट रायडर्स 4 गुण आणि +1.047 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर, चेन्नई सुपर किंग्स 4 गुण आणि +0.976 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर, राजस्थान रॉयल्स 4 गुण आणि +0.800 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर, गुजरात टायटन्स 4 गुण आणि -0.738 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहेत. तर सनरायझर्स हैदराबाद 2 गुण आणि +0.204 नेट रनरेटसह पाचव्या, लखनौ सुपर जायंट्स 2 गुण आणि +0.025 नेट रनरेटसह सहाव्या, दिल्ली कॅपिटल्स 2 गुण आणि -0.016 सातव्या, पंजाब किंग्स 2 गुण आणि -0.337 नेट रनरेटसह आठव्या, आरसीबी 2 गुण आणि -0.711 नेट रनरेटसह नवव्या स्थानावर आहे. तर मुंबईच्या खात्यात अजूनही काहीच नाही. पण नेट रनरेट -0.925 इतका आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पाथिराना, मुस्तफिजुर रहमान.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.
