IPL 2024 Points Table: दिल्ली कॅपिटल्स गुजरात टायटन्स सामन्यानंतर असा पडला फरक, मुंबई-पंजाबला दणका

IPL 2024 Points Table: आयपीएल 2024 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा धुव्वा उडवला. इतकंच काय तर दोन गुणांसह नेट रनरेटवर जबरदस्त प्रभाव पडला आहे. त्यामुळे गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे.

IPL 2024 Points Table: दिल्ली कॅपिटल्स गुजरात टायटन्स सामन्यानंतर असा पडला फरक, मुंबई-पंजाबला दणका
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 10:22 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 32 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा धुव्वा उडवला. अवघ्या 89 धावांवर गुजरात टायटन्सला रोखलं. विजयासाठी फक्त 90 धावांचं आव्हान मिळालं होतं. हे आव्हान दिल्ली कॅपिटल्सने 3 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सचा जबरदस्त फायदा झाला आहे. गुजरात टायटन्सला पराभूत करत दोन गुणांची कमाई झाली आहे. तसेच नेट रनरेटवर सकारात्मक प्रभाव पडला आहे.  गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सने थेट सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्सला मागे टाकलं आहे. थेटच नवव्या स्थानावरून सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. गुजरात टायटन्सचा 67 चेंडू आणि 6 गडी राखून पराभव केल्याने नेट रनरेटमध्ये जबरदस्त प्रभाव पडला आहे.  त्यामुळे प्लेऑफची शर्यत आणखी चुरशीची झाली आहे.

राजस्थान रॉयल्स संघ 12 गुण आणि 0.677 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. कोलकाता नाईट रायडर्स 8 गुण आणि 1.399 नेट रनरेटसह दुसऱ्या, चेन्नई सुपर किंग्स 8 गुण आणि 0.726 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर, सनरायझर्स हैदराबाद 8 गुण आणि 0.502 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे. लखनौ सुपर जायंट्स संघ 6 पैकी 3 सामन्यात विजय मिळवून 6 गुण आणि 0.038 नेट रनरेटसह पाचव्या स्थानी आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ 6 गुण आणि -0.070 नेट रनरेटसह सहाव्या स्थानी आहे.

गुजरात टायटन्सची घसरण सातव्या स्थानावर झाली आहे. तर नेट रनरेटवरही नकारात्मक प्रभाव पडला आहे. पंजाब किंग्स 4 गुण आणि -0.218 नेट रनरेटसह आठव्या, मुंबई इंडियन्स 4 गुण आणि -0.234 नवव्या स्थानावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने फक्त एक सामना जिंकला आहे. आरसीबी 2 गुण आणि -1.185 नेट रनरेटसह सर्वात शेवटी आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मुकेश कुमार, खलील अहमद.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.