
आयपीएल 2024 स्पर्धेतील 39 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यात चौकार आणि षटकारांची बरसात झाली. ऋतुराज गायकवाड आणि मार्कस स्टोइनिसने शतकी खेळी केली. तसेच दोन्ही बाजूने प्रत्येकी 4 चार गडी बाद करण्यात यश आलं. या सामन्यात दवबिंदूमुळे गोलंदाजी करणं खूपच कठीण झालं होतं. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 4 गडी गमवून 210 धावा केल्या आणि विजयासाठी 211 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान लखनौ सुपर जायंट्सने 19.3 षटकात पूर्ण केलं. चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांचा अक्षरश: कस लागला होता. मथीशा पथिरानाने 2, मुस्तफिझुर रहमानने 1 आणि दीपक चाहरने 1 गडी बाद केला. मुस्तफिझुरने एक गडी बाद करत पर्पल कॅपच्या शर्यतीत एन्ट्री घेतली आहे. टॉप 5 मध्ये पुन्हा एकदा स्थान मिळवलं आहे.
मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह 8 सामन्यात 13 विकेट्स घेत पहिल्या स्थानावर आहे. त्याचा इकोनॉमी रेट 6.37 इतका आहे. त्या खालोखाल 13 विकेटसह राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल आहे. त्याचा इकोनॉमी रेट बुमराहच्या तुलनेत जास्त आहे. त्याने 8.83 च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर 13 विकेटसह पंजाब किंग्सचा हर्षल पटेल आह. त्याने 9.58 च्या इकोनॉमीने गोलंदाजी केली आहे. चौथ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्सच्या मुस्तफिझुर रहमानने एन्ट्री घेतली आहे. त्याने 12 विकेट्स घेतल्या असून इकोनॉमी रेट हा 10.07 इतका आहे. पाचव्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा गेराल्ड कोएत्झी असून त्याने 12 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट 10.10 इतका आहे.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर.