AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashes 2025 : ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामनाही खिशात घालणार, इंग्लंडची चौथ्या दिवशी अशी स्थिती

एशेज कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं पारडं जड आहे. ऑस्ट्रेलियाला पाचव्या दिवशी विजयासाठी फक्त 4 विकेटची आवश्यकता आहे. तिसरा कसोटी सामना जिंकताच ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका खिशात घालणार आहे.

Ashes 2025 : ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामनाही खिशात घालणार, इंग्लंडची चौथ्या दिवशी अशी स्थिती
Ashes 2025 : ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामनाही खिशात घालणार, इंग्लंडची चौथ्या दिवशी अशी स्थितीImage Credit source: ICC Twitter
| Updated on: Dec 20, 2025 | 6:11 PM
Share

एशेज कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना एडिलेड ओव्हल मैदानात होत आहे. या सामन्यातील चार दिवसांचा खेळ संपला असून निर्णायक स्थितीवर आला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं पारडं जड दिसत आहे. पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 4 विकेटची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या डावात 371 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 286 धावांपर्यंत मजल मारू शकला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडे 85 धावांची आघाडी होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या डावात 349 धावा केल्या. तसेच पहिल्या डावातील आघाडीसह 434 धावा झाल्या आणि विजयासाठी 435 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव गडगडला. चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 6 गडी गमवून 207 धावा केल्या आहेत. अजूनही इंग्लंडचा संघ 228 धावांनी पिछाडीवर आहे.

ऑस्ट्रेलियाने कसोटी सामना विजयासाठी दिलेल्या 435 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव गडगडला. संघाच्या 4 धावा असताना पहिला धक्का बसला. बेन डकेट बाद झाल्याने इंग्लंडवर दबाव वाढला. त्यानंतर 31 धावा असताना बेन डकेट तंबूत परतला. त्यानंतर झॅक क्राउली आणि जो रूट यांनी तिसऱ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली. पण जो रूट मोठी खेळी करण्यास अपयशी ठरला. त्याने 63 चेंडूत 39 धावा केल्या आणि कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर झॅक क्राउलीने हॅरी ब्रूकसह डाव पुढे नेला. या दोघांमध्ये चौथ्या विकेसाठी 68 धावांची भागीदारी झाली. हॅरी ब्रूक 30 धावा करून तंबूत गेला. बेन स्टोक्स आला तसाच परत गेला. त्याने फक्त 5 धावा केल्या.

झॅक क्राउली 85 धावांवर बाद झाला आणि इंग्लंडच्या आशा संपुष्टात आल्या. कारण त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 6 गडी गमवून 207 धावा केल्या आहेत. जेमी स्मिथ नाबाद 2 आणि विल जॅक्स नाबाद 11 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी पाचव्या दिवशी फक्त 4 विकेट्सची गरज आहे. पाचव्या दिवशी हे गणित जुळून येईल यात काही शंका नाही. तर इंग्लंडला विजयासाठी 228 धावांची गरज आहे. पण या धावा गाठणं वाटतं तितकं सोपं नाही.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...