AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jeffrey Epstein : प्रायव्हेट आयलँड, आलिशान बंगले अन्… एपस्टीन किती श्रीमंत होता? संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल!

एपस्टीन फाईल्समधील कागदपत्रे समोर आल्यानंतर आता जगात खळबळ उडाली आहे. या कागदपत्रांमधील काही फोटो समोर आले आहेत. दरम्यान, हा एपस्टीन किती श्रीमंत होता, असे विचारले जात आहे. त्याची संपत्ती वाचून थक्क होऊन जाल.

Jeffrey Epstein : प्रायव्हेट आयलँड, आलिशान बंगले अन्... एपस्टीन किती श्रीमंत होता? संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल!
jeffrey epsteinImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 20, 2025 | 6:22 PM
Share

Jeffrey Epstein Net Worth : अमेरिकेच्या न्याय विभागाने नुकतेच एपस्टीन आयलँड प्रकरणाशी संबंधित साधारण तीन लाख कागदपत्रे सार्वजनिक केली आहेत. यात काही फोटो, व्हिडीओ तसेच काही कागदपत्रांचा समावेश आहे. यालाच आता एपस्टीन फाईल्स असे म्हटले जात असून त्यातील काही फोटोंमुळे तर जगभरात खळबळ उडाली आहे. या फोटोंमध्ये अब्जाधीस बिल गेट्स, प्रसिद्ध गायक आणि डान्सर मायकल जॅक्सन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प यासारख्या काही जगप्रसिद्ध व्यक्ती मुलींसोबत, महिलांसोबत दिसत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही काही फोटो या एपस्टीन फाईल्समध्ये आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेकांना अडचणीत आणणारा जेफ्री एपस्टीन याची संपत्ती किती होती? असे विचारले जात आहे.

मृत्यूवेळी एपस्टीनची संपत्ती किती होती?

मिळालेल्या माहितीनुसार 2019 साली जेफ्री एपस्टीन याचा मृत्यू झाला. मृत्यू झाला त्यावेळी एपस्टीनची संपत्ती साधारण 560 ते 600 दशलक्ष डॉलर्स असल्याचे सांगितले जाते. जेफ्री एपस्टीन अब्जाधीशांच्या संपत्तीचे व्यवस्थापन करायचा पण तो अब्जाधीश मात्र नव्हता. त्याच्याकडे संपत्ती मात्र अफाट होती.

एपस्टीनचे आलिशान बंगले

एपस्टीन याने त्याच्या संपत्तीतील बराच पैसा हा रियल इस्टेटमध्ये लावलेला होता. त्याच्याकडे न्यूयॉर्कमधील अपर इस्ट भागात एक 7 मजली भव्य बंगला होता. या बंगल्याची किंमत साधारण 50 दशलक्ष डॉलर्स होती. यासोबतच फ्लोरिडातील पाम बीच परिसरात त्याचा 12 दशलक्ष डॉलर्सचा आणखी एक बंगला होता. न्यू मेक्सिमध्ये त्याच्या मालकीचे एक 17 दशलक्ष डॉलर्सचे मोठे शेत होतो.

नावावर होतो दोन आयलँड

एपस्टीन याच्याकडे यूनायटेड स्टेट्स वर्जिन आलँड्समध्ये दोन प्रायव्हेट आलँड होते. लिटल सेंट जेम्स आणि ग्रेट सेंट जेम्स अशी या दोन आयलँडची नावे आहेत. 2023 साली कायदेशीर वाद झाल्यानंतर हे दोन्ही आयलँड साधारण 60 दशलक्ष डॉलर्सना विकण्यात आले होते.

एपस्टीन याचा कोणताही प्रसिद्ध आणि सर्वांना परिचित असलेला उद्योग नव्हता. तो लोकांच्या संपत्तीचे व्यवस्थापन करायचा. या व्यवस्थापनासाठी त्याच्याकडे श्रीमंत क्लायंट्स यायचे. तो या लोकांना असेट प्लॅनिंगची सेवा द्यायचा. लैंगिक शोषणाच्या आरोपात तुरुंगात गेल्यानंतर त्याचा 2019 साली मृत्यू झाला. त्यानंतर आता त्याच्याच नावाने एपस्टीन फाईल्सच्या रुपात खळबळजनक कागदपत्रे समोर आले आहेत.

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.