IPL 2024 Purple Cap : हर्षल पटेलला पछाडत जसप्रीत बुमराहने पुन्हा मिळवली पर्पल कॅप

IPL 2024 Purple Cap, Most wicket taker : जसप्रीत बुमराहने अवघ्या 24 तासांमध्ये पुन्हा एकदा पर्पल कॅप मिळवली आहे. पाहा टॉप 5 मध्ये कोण आहेत?

IPL 2024 Purple Cap : हर्षल पटेलला पछाडत जसप्रीत बुमराहने पुन्हा मिळवली पर्पल कॅप
mi jasprit bumrah,
Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 12, 2024 | 12:32 AM

जसप्रीत बुमराहने अवघ्या 24 तासांमध्ये पुन्हा एकदा पर्पल कॅप मिळवली आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान आणि घातक गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 60 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध इडन गार्डनमध्ये 2 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने या 2 विकेट्ससह पंजाब किंग्सच्या हर्षल पटेल याच्या 20 विकेट्सची बरोबरी केली. दोघांच्या नावावर समसमान विकेट्स असूनही बुमराह पर्पल कॅप मिळवण्यात यशस्वी ठरला. दोघांच्या खात्यात तेवढ्याच विकेट्स असूनही बुमराहला कोणत्या आधारावर पर्पल कॅप दिली? हे जाणून घेऊयात.

जसप्रीत बुमराहने 4 ओव्हरमध्ये 9.80 च्या इकॉनॉमी रेटने 39 रन्स देत 2 विकेट्स घेतल्या. बुमराहने स्टार ऑलराउंडर सुनील नरीन याला क्लिन बोल्ड केला. तर ग्रेट फिनीशर रिंकू सिंह याला 20 धावांवर विकेटकीपर ईशान किशन याच्या हाती कॅच आऊट केलं. बुमराहने अशाप्रकारे 2 विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलच्या तुलनेत जसप्रीत बुमराहने 1 सामना जास्त खेळलाय. मात्र हर्षलच्या तुलनेत बुमराहचा इकॉनॉमी सरस आहे. त्यामुळे मुंबईचा बॉलिंग कोच लसिथ मलिंगा याच्या हस्ते जसप्रीत बुमराहला पर्पल कॅप देण्यात आली.

पहिल्या पाचात कोण कोण?

जसप्रीत बुमराह याने 13 सामन्यांमध्ये 6.48 च्या इकॉनॉमी रेटने 20 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहची 21 धावा देऊन 5 विकेट्स ही या हंगामातील सर्वोच्च कामगिरी आहे. तर हर्षल पटेलने 12 सामन्यांमध्ये 9.75 च्या इकॉनॉमीने 20 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर वरुण चक्रवर्थी, अर्शदीप सिंह आणि सुनील नरीन अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानी विराजमान आहेत. या तिघांनी 12 सामन्यांमध्ये अनुक्रमे 17,16 आणि 15 विकेट्स घेतल्या आहेत.

जसप्रीत बुमराह पर्पल कॅपचा मानकरी

कोलकाता नाईट रायडर्स प्लेईंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

मुंबई इंडियन्स प्लेईंग ईलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पियुष चावला, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा.