AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 Purple Cap : पर्पल कॅप कुणाच्या डोक्यावर? मुंबईसाठी गूड न्यूज

IPL 2024 Purple Cap, Most wicket taker : रविवार 7 एप्रिलच्या डबल हेडरनंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत चांगलीच चढाओढ पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 21 सामन्यानंतर पर्पल कॅप कुणाकडे आहे?

IPL 2024 Purple Cap : पर्पल कॅप कुणाच्या डोक्यावर? मुंबईसाठी गूड न्यूज
ipl 2024 purple cap,
| Updated on: Apr 08, 2024 | 12:11 AM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमात रविवारी 7 एप्रिल रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने होते. मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियममध्ये आपल्या घरच्या सामन्यात दिल्लीवर 29 धावांनी मात केली. दिल्लीला विजयासाठी मिळालेल्या 235 धावांचा पाठलाग करताना 8 विकेट्स गमावून 205 धावाच करता आल्या. मुंबईकडून गेराल्ड कोएत्झी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर दिल्लीकडून पर्पल कॅपच्या शर्यतीत असलेल्या खलील अहमद याने 1 विकेट घेतली.

तप डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने होते. लखनऊने गुजरातला विजयासाठी 164 रन्सचं टार्गेट दिलं होतं. गुजरातला ऑलआऊट 133 धावाच करता आल्या. लखनऊने हा सामना 33 धावांनी जिंकला. या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण कुठे आहे? हे आपण जाणून घेऊयात.

युझवेंद्र चहल याच्याकडेच पर्पल कॅप

डबल हेडरनंतर पर्पल कॅप होल्डर बॉलर बदललेला नाही. मात्र टॉप 5 मध्ये अदलाबादल झाली आहे. तसेच पर्पल कॅपच्या टॉप 5 मध्ये लखनऊ विरुद्ध गुजरात सामन्याचा काहीही परिणाम झालेला नाही. राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल याने पर्पल कॅप आपल्याकडे कायम राखली आहे. तर खलील अहमद याने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. मोहित शर्मा आणि खलील अहमद या दोघांच्या नावावर समसमान विकेट्स आहेत. मात्र मोहितच्या तुलनेत खलीलचा इकॉनॉमी रेट चांगला आहे. त्यामुळे खलीलने दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली.

गेराल्ड कोएत्झी पाचव्या स्थानी

मोहित शर्माला लखनऊ विरुद्धच्या सामन्यात विकेट न मिळाल्याने त्याला हा फटका बसलाय. मोहित दुसऱ्यावरुन तिसऱ्या स्थानी आल्याने सीएसकेचा मुस्तफिजुर रहमान हा चौथ्या क्रमांकावर आला आहे. या डबल हेडरआधी मुस्तफिजुर तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे 6 एप्रिलपर्यंत चौथ्या क्रमांकावर असलेला मयंक यादव हा पहिल्या पाचातून बाहेर फेकला गेला आहे. तर पाचव्या स्थानी मुंबईचा गेराल्ड कोएत्झी आला आहे. गेराल्डने दिल्ली विरुद्ध सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

पर्पल कॅप आणि टॉप 5 गोलंदाज

युझवेंद्र चहल – 4 सामने 8 विकेट्स. खलील अहमद – 5 सामने 7 विकेट्स. मोहित शर्मा – 5 सामने 7 विकेट्स. मुस्तफिजुर रहमान – 3 सामने 7 विकेट्स. गेराल्ड कोएत्झी – 4 सामने 7 विकेट्स.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.