IPL 2024 Purple Cap : मुंबई राजस्थानच्या सामन्यानंतर पर्पल कॅप कोणाच्या डोक्यावर? जाणून घ्या

IPL 2024 Purple Cap, Most wicket taker : आयपीएल 2024 स्पर्धेतील 38 वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. हा सामना राजस्थान रॉयल्सने 1 गडी गमवून जिंकला. तर मुंबईच्या पराभवामुळे प्लेऑफचं गणित किचकट झालं आहे.

IPL 2024 Purple Cap : मुंबई राजस्थानच्या सामन्यानंतर पर्पल कॅप कोणाच्या डोक्यावर? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Apr 22, 2024 | 11:50 PM

पर्पल कॅपच्या शर्यतीत मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीम बुमराह आघाडीवर आहे.जसप्रीत बुमराहने 8 सामन्यात 6.37 च्या इकोनॉमी रेटने 13 गडी बाद केले आहेत. राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहल या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नावावरही 13 विकेट्स असून इकोनॉमी रेट 8.83 इतका आहे. तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्सचा हर्षल पटेल आहे. त्यानेही एकूण 13 गडी बाद केले आहेत. मात्र बुमराह-चहलच्या तुलनेत इकोनॉमी रेट हा 9.58 इतका आहे. चौथ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा गेराल्ड कोएत्झी आहे. त्याने 12 गडी बाद केले असून इकोनॉमी रेट 10.14 आहे. पाचव्या स्थानावर पंजाब किंग्सचा सॅम करन असून त्याने 8 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या असून इकोनॉमी रेट 8.79 इतका आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहला एकही विकेट घेता आली नाही.  मात्र इकोनॉमी रेटवर परिणाम झाला आहे. या सामन्यापूर्वी इकोनॉमी रेट हा 5.93 इतका होता.

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

आयपीएल स्पर्धेतील 38व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी निवडली. हा निर्णय काही अंशी चुकला असंच म्हणावं लागेल. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. तसेच शेवटच्या षटकात विकेट झटपट पडल्याने 200 पार धावा गेल्या नाहीत. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 9 गडी गमवून 179 धावा केल्या आणि विजयासाठी 180 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान रोखताना मुंबई इंडियन्सने गचाळ क्षेत्ररक्षण केलं. मोक्याच्या क्षणी यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन यांचा झेल सोडला. राजस्थानने मुंबईने दिलेलं आव्हान 1 गडी गमवून पूर्ण केलं.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.

Non Stop LIVE Update
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.