IPL 2024 Purple Cap: पर्पल कॅप मिळवण्यात हैदराबाद आरसीबीचे गोलंदाज फेल, पॅट कमिन्स टॉप 5 मध्ये

PL 2024 Purple Cap, Most wicket taker : आयपीएल स्पर्धेतील 30 व्या सामन्यात गोलंदाजांची सर्वाधिक धुलाई झाली. सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी आरसीबीच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. तसेच आयपीएल स्पर्धेत 3 विकेट गमवून 287 धावा केल्या. हा आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर आहे. असं असलं तरी दोन्ही संघाचे गोलंदाज हवी तशी छाप पाडू शकले नाहीत.

IPL 2024 Purple Cap: पर्पल कॅप मिळवण्यात हैदराबाद आरसीबीचे गोलंदाज फेल, पॅट कमिन्स टॉप 5 मध्ये
Follow us
| Updated on: Apr 15, 2024 | 11:37 PM

आयपीएल स्पर्धेतील 30 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला धावांनी पराभूत केलं आहे. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी बाद करून 287 धावा केल्या आणि विजयासाठी 288 धावांचं आव्हान मिळालं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ 20 षटकात 7 गडी गमवून  262 धावा करू शकला. यासह गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला जबर फटका बसला आहे. गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे येथून पुढे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं प्लेऑफचं गणित खूपच किचकट झालं आहे. आता उर्वरित सात सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागेल. दुसरीकडे, या सामन्यात पॅट कमिन्स सोडता एकही गोलंदाज हवी तशी कामगिरी करू शकला नाही. या कामगिरीसह पॅट कमिन्सने टॉप पाच मध्ये एन्ट्री मारली आहे. पण पर्पल कॅपचा मान अजूनही राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या डोक्यावर आहे.

राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने आपल्या फिरकीची जादू दाखवून दिली आहे. आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यात 7.40 च्या इकोनॉमी रेटने 11 विकेट्स घेतल्या आहेत. यासह युझवेंद्र चहल पहिल्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यानंतरही हे स्थान अबाधित आहे. दुसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह असून त्याने 6 सामन्यात 6.08 च्या इकोनॉमी रेटने 10 विकेट्स घेतल्या.  चेन्नई सुपर किंग्सचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमान तिसऱ्या स्थानावर असून त्याच्या नावावर 10 विकेट्स आहेत. मात्र त्याचा इकोनॉमी रेट 8.94 इतका आहे. पॅट कमिन्सने 4 षटकात 43 धावा देऊन 3 गडी बाद केले. यासह पॅट कमिन्सने टॉप 5 मध्ये एन्ट्री मारली असून चौथ्या स्थानावर आहे. पॅट कमिन्सने 6 सामन्यात 7.35 च्या इकोनॉमी रेटने 9 गडी बाद केले आहेत.

Purple_Cap (2)

पंजाब किंग्सचा कगिसो रबाडाच्या नावावर 9 विकेट्स असून त्याने 7.95 च्या इकोनॉमी रेटने गडी बाद केले आहेत. रबाडा गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. तर सहाव्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा खलिल अहमद आहे. त्याने सहा सामन्यात 8.79 इकोनॉमी रेटने 9 गडी बाद केले आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, सौरव चौहान, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, विजयकुमार विशक, रीस टोपले, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.