IPL 2024 Purple Cap : पर्पल कॅप पहिल्या दिवसापासूनच या खेळाडूच्या डोक्यावर

आयपीएल 2024 स्पर्धेती पर्पल कॅपची शर्यत गेल्या काही दिवसांपासून मंदावलेली आहे. कारण बांगलादेशच्या मुस्तफिझुर रहमानची नऊ सामन्यांपासून एकहाती सत्ता पाहायला मिळत आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यानंतरही यात काही फरक पडलेला नाही.

IPL 2024 Purple Cap : पर्पल कॅप पहिल्या दिवसापासूनच या खेळाडूच्या डोक्यावर
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 11:33 PM

आयपीएल स्पर्धेत आता दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरु आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात फक्त एक सामना झाला आहे. उर्वरित सर्व संघानी प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 9 सामने पार पडले असून पहिल्या दिवसापासून पर्पल कॅपच्या शर्यतीत फक्त एक नाव आघाडीवर आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या मुस्तफिझुर रहमान हा अव्वल स्थानी आहे. मुस्तफिझुर रहमान याने पहिल्याच सामन्यात 4 गडी बाद केले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात 4 षटकात 29 धावा देत 4 गडी बाद केले होते. त्यानंतर गुजरातविरुद्धच्या सामन्यात 2 गडी बाद केले आणि एकूण 6 विकेट्स नावावर झाले. सहा विकेट्ससह मुस्तफिझुर रहमान हा नऊ सामने पहिल्या स्थानावर कायम आहे. त्याच्या आसपासही कोणता खेळाडू सध्यातरी नाही. त्यानंतर 3 विकेट्स घेत इतर खेळाडू आहेत.

हरप्रीत ब्रार 2 सामन्यात 3 गडी घेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचा इकोनॉमी रेट 3.85 इतका असल्याने दुसऱ्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत टाकलेल्या 7 षटकात फक्त 27 धावा दिल्या आहेत. मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह हा तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानेही तीन गडी बाद केले आहेत. एकूण 8 षटकात 50 धावा दिल्याने त्याचा इकोनॉमी रेट हा 6.25 इतका आहे. चौथ्या स्थानावर युजवेंद्र चहल याने झेप घेतली आहे. त्याने 3 गडी बाद केले असून त्याचा इकोनॉमी रेट 7.33 इतका आहे. पाचव्या स्थानावर पंजाब किंग्सचा कगिसो रबाडा आहे. त्याने 2 सामन्यात 3 गडी बाद केले असून इकोनॉमी रेट 7.37 इतका आहे.

गोलंदाजसामनेइकॉनोमीविकेट्स
मुस्तफिझुर रहमान38.83 7
मयंक यादव35.126
युजवेंद्र चहल35.506
मोहित शर्मा37.756
खलील अहमद48.186

दरम्यान राजस्थान रॉयल्स संगाने 20 षटकात 5 गडी गमवून 185 धावा केल्या आणि विजयाशाठी 186 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 5 गडी गमवून 173 धावा केल्या आणि विजयासाठी 12 धावा कमी पडल्या. राजस्थान रॉयल्सकडून युजवेंद्र चहलने 2, नांद्रे बर्गरने 2 आणि आवेश खानने एक गडी बाद केला.

दोन्ही संघांचे खेळाडू

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, आवेश खान

Non Stop LIVE Update
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.