IPL 2022: या कारणामुळे रवींद्र जडेजाला धोनीपेक्षा जास्त पैसे मिळाले, वाचा सविस्तर

आयपीएलमध्ये जडेजाची निवड ही पहिल्या पसंतीनं झाली आहे. तर धोनीची निवड दुसरा खेळाडू म्हणून झाली आहे. आयपीएलमध्ये पहिल्या खेळाडूला 16 कोटी तर दुसऱ्या खेळाडूला 12 कोटी देण्यात आले आहेत.

IPL 2022: या कारणामुळे रवींद्र जडेजाला धोनीपेक्षा जास्त पैसे मिळाले, वाचा सविस्तर
MS Dhoni, Jadeja, Ashwin

मुंबई : आयपीएलचं रिटेन्शन पार पडल्यापासून सर्वांना एकच सवाल आहे, तो म्हणजे रवींद्र जडेजाला धोनीपेक्षा जास्त पैसे का मिळाले? या निर्णयाने सर्वांनाच चकीत करून सोडले आहे. पण धोनीपेक्षा जडेजाला जास्त पैसे मिळण्याची काही खास कारणं आहेत. गेल्या काही वर्षांपासून रवींद्र जडेजाच्या चांगल्या कामगिरीत सातत्य आहे. रवींद्र जडेजान चेन्नई सुपर किंग्जसाठी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे तो या वर्षीचा महागडा खेळाडू ठरला आहे.

जडेजाची निवड पहिल्या पसंतीनं

आयपीएलमध्ये जडेजाची निवड ही पहिल्या पसंतीनं झाली आहे. तर धोनीची निवड दुसरा खेळाडू म्हणून झाली आहे. आयपीएलमध्ये पहिल्या खेळाडूला 16 कोटी तर दुसऱ्या खेळाडूला 12 कोटी देण्यात आले आहेत. म्हणून जडेजाला 16 कोटी तर धोनीला 12 कोटी मिळाले आहेत. जडेजा किती महत्वाचा खेळाडू आहे हे धोनीलाही चांगलच माहीत आहे.

जडेजाची मागील सातत्यापूर्ण कामगिरी

मागील दोन आयपीएलमधील जडेजाच्या कामगिरीवरही नजर टाकू.

आयपीएल 2020

  1. मॅच – 14
  2. रन – 232
  3. बेस्ट स्कोर – 50

आयपीएल 2021

  1. मॅच-16
  2. रन – 227
  3. बेस्ट स्कोर – 62 रन

सर्वात उत्कृष्ट ऑलराऊंडर

गेल्या काही आयपीएलमध्ये जडेजाने सर्वा बेस्ट ऑलराऊंडरची भूमिका निभावली आहे. गोलंदाजी, फलंदाजी, बेस्ट फिल्डर अशी चौफेर कामगिरी त्याने उत्तम केली आहे. त्यामुळे धोनी जडेजाला नेहमीच टीममध्ये ठवतो. त्यामुळे जडेजाचं महत्व चांगलच वाढलं आहे. प्रत्येक टीमला असा एक खेळाडू टीममध्ये अपेक्षित असतो. या चमकदार कामगिरीमुळेच चेन्नईने जडेजाची निवड पहिल्या स्थानी केली आहे. चन्नईने दाखवलेल्या विश्वासावर आगामी आयपीएलमध्ये जडेजा किती खरा उतरतो ते आयपीएल 2022 नंतरच कळेल.

भाजपविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढली पाहिजे, काँग्रेस हाच पर्याय : नाना पटोले

VIDEO: ममता बॅनर्जी पवारांसमोरच म्हणाल्या, यूपीए आहे कुठे?; ममतादीदींनी काँग्रेस नेतृत्व नाकारलं?

महावितरणने अतिरेक केल्यास जशास तसं उत्तर देणार, उर्जामंत्री नितीन राऊतांना राजू शेट्टींचं उत्तर

Published On - 6:23 pm, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI