भाजपविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढली पाहिजे, काँग्रेस हाच पर्याय : नाना पटोले

वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

भाजपविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढली पाहिजे, काँग्रेस हाच पर्याय : नाना पटोले
नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस

मुंबई : भारतीय जनता पक्ष हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे. भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहेत. देशातील जनता हे पहात आहे. वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी मोदी सरकारविरोधात लढले

त्यांनी मुंबई दौऱ्यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.  सत्ता, पैसा आणि स्वायत्त संस्थाचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने देशाच्या लोकशाही आणि संविधानाला संपवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. भाजपच्या या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहेत. राहुल गांधी हेच मोदी आणि भाजपाविरोधात ठामपणे उभे राहिले. भूसंपादन कायद्यातील बदल आणि तीन काळ्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून राहुल मोदी सरकारविरोधात लढले, असे पटोले म्हणाले.

राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही

तसेच भाजपची विभाजनवादी नीती, महागाई, बेरोजगारी, शेतकरीविरोधी धोरणे, सर्वसामान्यांचे प्रश्न यावर सातत्याने काँग्रेसनेच लढा दिला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व्यक्तीगत महत्वाकांक्षेला बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी, लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी सर्व समविचारी राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन लढा देण्याची वेळ आली आहे. एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेसहाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

ममता बॅनर्जी काय म्हणाल्या होत्या ?

पश्चिम बंगालच्या पंतप्रधान ममता बॅनर्जी दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. तसेच आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीदेखील भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर बैठक चालली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पण यावेळी जनतेला तिसरा पर्याय देणार का असा सवाल पत्रकारांनी विचारल्यानंतर तसा विचार नाही, जे येतील त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा विचार आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

इतर बातम्या :

ममतांसोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? पवारांनी जे सांगितलं त्यानं काँग्रेसची चिंता वाढणार?

Video | अंबरनाथमध्ये लग्नाच्या मंडपात हवेत गोळीबार, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून चौकशी सुरु

Twitter CEO: ट्विटरचा नवा सीईओ मुळ भारतीय आहे, मग पाकिस्तानची एवढी का खिल्ली उडवली जातेय? वाचा कारणं

Published On - 6:13 pm, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI