Video | अंबरनाथमध्ये लग्नाच्या मंडपात हवेत गोळीबार, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून चौकशी सुरु

अंबरनाथ येथे मलंगगड परिसरातील हाजीमलंगवाडी गावात 29 नोव्हेंबर रोजी एक लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. या लग्नात शिवाजी पाटील नामक व्यक्तीने मोठ्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला. त्याचा व्हिडीओ आता समोर आलाय. याच व्हिडिओमध्ये एक तरुण हातात रिव्हॉल्वर घेऊन उभा असल्याचं दिसत आहे.

Video | अंबरनाथमध्ये लग्नाच्या मंडपात हवेत गोळीबार, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून चौकशी सुरु
ambarnath firing

ठाणे : अंबरनाथ तालुक्यात पार पडलेल्या एका लग्नात हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना घडलीये. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या गोळीबाराच्या घटनेची चौकशी सुरु केली आहे.

बंदुकीतून केला हवेत गोळीबार 

मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ येथे मलंगगड परिसरातील हाजीमलंगवाडी गावात 29 नोव्हेंबर रोजी एक लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. या लग्नात शिवाजी पाटील नामक व्यक्तीने मोठ्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला. त्याचा व्हिडीओ आता समोर आलाय. याच व्हिडिओमध्ये एक तरुण हातात बंदूक घेऊन उभा असल्याचं दिसत असून त्याच्या बाजूला याच गावातील उपसरपंच देखील उपस्थित आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पोलिसांकडून तपास सुरु

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिललाईन पोलिसांनी त्याची दखल घेतली. तसेच त्याविषयी चौकशी सुरु केलीय. ज्या बंदुकीतून हा गोळीबार करण्यात आला ती बंदूक नेमकी कोणत्या प्रकारची होती? यासह सर्वच गोष्टींचा तपास पोलिसांनी सुरू केलाय. या घटनेत दोषी असणार्‍यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी दिलीय. मात्र अद्याप या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नसल्यानं कॅमेरासमोर बोलण्यास त्यांनी तूर्तास नकार दिलाय.

इतर बातम्या :

Aurangabad: फाइव्ह स्टार हॉटेलच्या शाही विवाह सोहळ्यातून 12 तोळ्यांचे दागिने, दोन लाखांची रोकड लंपास!

व्यसनी व्यक्ती, 10 वर्षांच्या मुलाचे अपहरण अन् आकाश-पाताळ एक करणारे पोलीस; एका सुटकेची चित्तरकथा…

Pune Crime | किरकोळ वादातून मित्राचा खून, रक्तरंजित चाकू घेऊन आरोपी थेट पोलीस ठाण्यात


Published On - 5:41 pm, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI