Pune Crime | किरकोळ वादातून मित्राचा खून, रक्तरंजित चाकू घेऊन आरोपी थेट पोलीस ठाण्यात

गमतीत झालेल्या भांडणातून एका मित्राने दुसऱ्या मित्राचा खून (Friend Murder) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. मित्रानेच मित्रावर चाकुने सपासप वार करत त्याचा निर्घृण अंत केला. यानंतर त्या आरोपी मित्राने स्वत:च पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिलीये. फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मित्राला ताब्यात घेतलं आहे.

Pune Crime | किरकोळ वादातून मित्राचा खून, रक्तरंजित चाकू घेऊन आरोपी थेट पोलीस ठाण्यात
मालमत्तेच्या वादातून बंगालमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या

पुणे : गमतीत झालेल्या भांडणातून एका मित्राने दुसऱ्या मित्राचा खून (Friend Murder) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. मित्रानेच मित्रावर चाकुने सपासप वार करत त्याचा निर्घृण अंत केला. यानंतर त्या आरोपी मित्राने स्वत:च पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिलीये. फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मित्राला ताब्यात घेतलं आहे.

अमन अशोक यादव (वय 26) असं खून झालेल्या मित्राचं नाव आहे. तर, चेतन पाटील असं खून करणाऱ्या मित्राचं नाव आहे. पुण्यातील आसरीएम गुजराती शाळेसमोरील फुटपाथवर ही घटना घडलीये.

नेमकं असं काय घडलं की मित्रानेच मित्राला संपवलं?

आरोपी चेतन पाटील आणि अमन अशोक यादव हे दोघेही पक्के मित्र होते. ते कचरा वेचण्याचे काम करतात. काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये अगदी किरकोळ कारणावरुन वाद झाला. अमन ते विसरला पण चेतनने त्याचा राग डोक्यात ठेवला.

बुधवारी (1 डिसेंबर) सकाळच्या सुमारास ते दोघे कचरा गोळा करण्यासाठी भेटले. कचरा गोळा करण्यासाठी जेव्हा ते आसरीएम गुजराती शाळेसमोर आले. येथील फुटपाथवर ते कचरा गोळा करण्याचं काम करत असताना त्यांच्यात पुन्हा बाचाबाची सुरु झाली. याचे रुपांतर वादात झाले आणि रागाच्या भरात चेतन पाटील याने अशोक यादववर चाकुने सपासप वार केले. त्यानंतर अमनला त्याच अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात सोडून तो थेट पोलीस ठाण्यात पोहोचला.

हातात रक्तरंजित चाकू घेऊन थेट पोलिसांत 

हातात रक्तरंजित चाकू घेतलेल्या चेतन पाटीलला पाहून काही काळ पोलिसांचीही धांदल उडाली. चेतन पाटीलने पोलिसांना घडलेली सारी हकीगत सांगितली आणि त्याने अशोकचा खून केल्याची कबुली दिली. चेतनने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा तिथे त्यांना अशोक यादवचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर, आरोपी मित्र चेतन पाटीलला ताब्यात घेतलं आहे.

संबंधित बातम्या :

Video | रस्त्याच्या कडेला टोळकं दबा धरुन बसलं, गाडीतून उतरताच लाठ्याकाठ्यांनी महिलेला बदडलं, पोलिसात तक्रार

Pune crime | घटस्फोटास नकार दिल्याने रागवलेल्या पतीने बुक्कीत पाडला पत्नीचा दात

Published On - 2:03 pm, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI