व्यसनी व्यक्ती, 10 वर्षांच्या मुलाचे अपहरण अन् आकाश-पाताळ एक करणारे पोलीस; एका सुटकेची चित्तरकथा…

त्याला विकण्याच्या हेतूने तो मुंबईत घेऊन गेला. तो त्याला विकणार होता, पण त्याच्या कृत्याचा दिल्ली पोलिसांना सुगावा लागला. अन् सुरू झाले त्या मुलाच्या सुटकेसाठी प्रयत्न. पुढे काय झाले, तुम्हीच वाचा...

व्यसनी व्यक्ती, 10 वर्षांच्या मुलाचे अपहरण अन् आकाश-पाताळ एक करणारे पोलीस; एका सुटकेची चित्तरकथा...
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः एका व्यसनी व्यक्तीने अवघ्या 10 वर्षांच्या मुलाचे दिल्लीतून अपहरण केले. त्याला विकण्याच्या हेतूने तो मुंबईत घेऊन गेला. तो त्याला विकणार होता, पण त्याच्या कृत्याचा दिल्ली पोलिसांना सुगावा लागला. अन् सुरू झाले त्या मुलाच्या सुटकेसाठी प्रयत्न. पुढे काय झाले, तुम्हीच वाचा…

प्रकरण काय?

त्याचे झाले असे की, सध्या कोरोना आहे. अनेक ठिकाणी शाळा सुरूयत. कुठे नाहीत. त्या लहान मुलाची आई घरोघरी जावून काम करते. धुणी, भांडी तर कुठे स्वयंपाक. हा मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत दिल्लीच्या शाहरदा भागात रहायचा. तिथे जवळच असलेल्या मानस सरोवर पार्कमध्ये हे कुटुंब गेलेले. तिथून हा मुलगा गायब झाला. मुलाच्या आई-वडिलांनी आकाश-पाताळ एक केले. मात्र, तो सापडला नाही.

अ्न पोलिसही हेलावले

शेवटी मुलाला शोधून-शोधून थकलेल्या आई-वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. 25 नोव्हेंबर रोजी तक्रार नोंदवली. त्यांनी पोलिसांसमोर अक्षरशः रडूरडू सारा प्रसंग कथन केला. काहीही करा, पण आमच्या मुलाला शोधा अशी हात जोडून विनवणी केली. आईचे आपल्या मुलासाठीचे अंतकरण पाहून पोलीसही हेलावून गेले. त्यांनी त्या मुलाला शोधण्याचा चंग बांधला. अन् सुरू झाला त्या मुलाच्या शोधाचा प्रवास.

सुगावा लागला

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तेव्हा त्यांना असे समजले की, शिवशंकर नावाचा एक व्यसनी 25 नोव्हेंबरपासून गायब आहे. तेव्हा त्यांचा संशय बळावला. त्यांनी मुलाच्या आईला शिवशंकरच्या मोबाइलवर फोन करायला लावला. तेव्हा शिवशंकर याने आपण दिल्लीतल्या पठाणकोट येथे असल्याचे सांगितले. सोबतच त्या मुलाबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही म्हणत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर आपला फोन स्वीचऑफ केला.

खोटे समोर आले

स्वस्त बसतील ते पोलीस कसले. मग त्यांनी शिवशंकरचा माग काढला. तेव्हा तो मुंबईला असल्याचे कळले. विशेष म्हणजे तो 25 नोव्हेंबरलाच दिल्लीतून पसार झाल्याचे समोर आले. म्हणजे तो मुलाच्या आईशी खोटे बोलत होता. पोलिसांचा संशय खरा ठरला. पोलिसांनी आपला तपास वाढवला. माणसे कामाला लावली. तेव्हा शिवशंकरने मुंबईतल्या धारावी भागात एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने बस्तान थाटल्याचे उघड झाले.

धारावीला धडक

दिल्ली पोलिसाच्या पथकाने शिवशंकर ज्या भागात रहायचा त्या धारावीत धडक दिली. तेव्हा त्यांना मुलगा माहिम रेल्वे स्थानकात असल्याचे समजले. त्यांनी तिथून त्या मुलाला सोडवले. तेव्हा आरोपी शिवशंकर मुलाला आमिष दाखवून मुंबईला घेऊन आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्याला या मुलाला विकायचे होते, पण प्रयत्न फसला. अन् तो पोलिसांच्या तावडीत सापडला. तुम्हीही दक्ष रहा. बाहेर गेल्यानंतर आपल्या लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. कारण असे शिवशंकर कुठे लपले असतील, याचा नेम नसतो.

इतर बातम्याः

फडणवीसांनी मिळवलेले मराठा आरक्षण महाविकास आघाडी सरकारने घालवले, विनायक मेटेंचा हल्लाबोल

हायकोर्टाच्या सुनावणीपूर्वीच मॉडर्न कॅफे जमीनदोस्त; नाशिकमध्ये महापालिका आयुक्तांची वादग्रस्त कारवाई

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI