
डब्लिन | आयर्लंडने टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात टॉस जिंकला आहे. कॅप्टन पॉल स्टर्लिंग याने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात ज्या भारतीय युवा खेळाडूंना पावसामुळे बॅटिंगची संधी मिळाली नव्हती त्यांना ती मिळणार आहे. यामुळे रिंकू सिंह आयर्लंड विरुद्ध कशी कामगिरी करतो, याकडे भारतीय चाहत्यांचं नजरा लागून आहेत. या दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया आणि आयर्लंड या दोन्ही संघांनी प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
आयर्लंडचा फिल्डिंगचा निर्णय
Ireland have won the toss and elect to bowl first in the 2nd T20I.
Live – https://t.co/vLHHA68NQI… #IREvIND pic.twitter.com/PT9t3CFT8T
— BCCI (@BCCI) August 20, 2023
टीम इंडियाने आयर्लंड विरुद्ध पहिला टी 20 सामना हा डकवर्थ लुईसनुसार 2 धावांनी जिंकला. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे आता टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला आयर्लंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागेल. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात कोण सरस ठरतं हे काही तासात स्पष्ट होईल.
पहिल्या सामन्यात पाऊस झाल्याने सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे सलामी जोडीचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या इतर खेळाडूंना बॅटिंगची संधी मिळाली नाही. मात्र या सामन्यात टीम इंडियाची पहिली बॅटिंग आहे. त्यामुळे आता रिंकू सिंह याची बॅटिंग पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत.
दरम्यान आतापर्यंत आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 6 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये टीम इंडियाच आयर्लंडवर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने 6 पैकी 6 सामन्यात आयर्लंडचा पराभव केला आहे.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | जसप्रीत बुमराह (कॅप्टन) ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई.
आयर्लंड प्लेईंग इलेव्हन | पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.