Ireland vs India T20I | टीम इंडियाने सीरिज जिंकली, पण हा खेळाडू दुर्देवी ठरला
Ireland vs India T20I Series | टीम इंडियाने आयर्लंड विरुद्धची टी 20 मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. मात्र टीम इंडियाचा तो खेळाडू दुर्देवी ठरला.

डब्लिन | आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरी टी 20 मॅच ही रद्द केली गेली आहे. तिसऱ्या सामन्याचं आयोजन हे द व्हिलज डब्लिन इथे आयोजित करण्यात आला होता. मात्र सामना सुरु होण्याआधीपासून पाऊस सुरु झाला होता. पाऊस सातत्याने सुरु होता. आता थांबेल नंतर थांबेल म्हणत क्रिकेट चाहते पाऊस विश्रांती घेईल याची वाट पाहत होते. मात्र पाऊस काही थांबला नाही. त्यामुळे टॉसही होऊ शकला नाही. ठराविक अंतराने पंचांकडून पाहणी करण्यात येत होती. मात्र जवळपास अडीच ते 3 तासांची वाट पाहिल्यानंतर अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सामान रद्द झाल्याने टीम इंडियाने मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. पहिल्यांदाच कॅप्टन्सी करणाऱ्या जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात टीम इंडियाने मालिका जिंकली. मात्र टीम इंडियाचा एक खेळाडू हा पुन्हा दुर्देवी ठरला. युवा विकेटकीपर बॅट्समन जितेश शर्मा याला तिसऱ्या टी 20 सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळणार असल्याची तीव्र शक्यता वर्तवण्यात येत होती.
जितेशची याआधी न्यूझीलंड आणि श्रीलंका विरुद्धच्या टी 20 सारिजमध्ये निवड करण्यात आली. मात्र तेव्हा संधी मिळाली नाही. आता आयर्लंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात तरी संधी मिळेल, अशी शक्यता होती. मात्र आता पावसाने खोडा घातला. त्यामुळे जितेश शर्मा या कमनशिबी ठरला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
तिसरा टी 20 सामना रद्द
The third T20I has been abandoned due to rain and wet ground conditions. India win the series 2-0. #TeamIndia #IREvIND pic.twitter.com/sbp2kWYiiO
— BCCI (@BCCI) August 23, 2023
आयर्लंड विरुद्ध मालिका विजयाची हॅटट्रिक
तसेच टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्धचा हा सलग तिसरा टी 20 मालिका विजय ठरला आहे. टीम इंडियाने 2018 मध्ये विराट कोहली याच्या कॅप्टन्सीत आयर्लंड विरुद्ध द्विपक्षीय मालिका जिंकली होती. त्यानंतर हार्दिक पंड्या याने आपल्या नेतृत्वात 2022 मध्ये टीम इंडियाला मालिका जिंकून दिली. तर आता बुमराहने मालिका विजयाची हॅटट्रिक पूर्ण करुन दिली.
टी 20 सीरिजसाठी आयर्लंड क्रिकेट टीम | पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वोरकॉम, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.
आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया | जस्प्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.
