जेम्स अँडरसनची क्रिकेटमधून निवृत्ती, पण ट्रोल होतोय बाबर आझम; का ते जाणून घ्या
जेम्स अँडरसन याने वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळून निवृत्ती घेतली आहे. शेवटच्या कसोटी सामन्यात अँडरसनने 4 गडी बाद केले आणि 704 विकेटसह कसोटी कारकिर्दिला पूर्णविराम दिला. असं सर्व असताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ट्रोल होत आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. जेम्स अँडरससने 188 कसोटी सामन्यात 704 विकेट्स घेतल्या. इतक्या विकेट्सचा टप्पा गाठणारा जेम्स अँडरसन हा जगातील पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे जेम्स अँडरसनच्या गोलंदाजी महिती अधोरेखित होते. त्यामुळे या दिग्गज खेळाडूवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यानेही शुभेच्छा दिल्या. मात्र एक चूक केली आणि ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. बाबर आझमने एक्स हँडलवर पोस्ट करताना लिहिलं की, तुझ्या कटर चेंडूंचा सामना करणं भाग्य समजतो जिम्मी..या पोस्टमधील कटर हा शब्द नेटकऱ्यांच्या दृष्टीक्षेपात पडताच ट्रोल होऊ लागला आहे. त्यानंतर बाबर आझमला ही पोस्ट डिलिट करून नवी पोस्ट करावी लागली. मात्र तिथपर्यंत त्याची जुनी पोस्टचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये त्याने आपली चूक सुधारली आणि कटरऐवजी स्विंग या शब्द वापरला आहे.
“तुझ्या स्विंगचा सामना करणं हे माझं भाग्याची गोष्ट होती. एक महान खेळाडूची उणीव भासेल. तू क्रिकेटसाठी दिलेलं योगदान खरंच उल्लेखनीय आहे. GOAT तुझ्याबद्दल मनापासून आदर आहे.’, अशी पोस्ट बाबर आझमने नंतर लिहिली. कटरबाबत सांगायचं तर अँडरसनने बाबर आझमला क्वचितच कटर गोलंदाजी केल्याचं क्रीडाप्रेमींनी निदर्शनास आणलं. त्यामुळे त्याला कटर ऐवजी स्विंग शब्द वापरावा लागला. एका युजर्सने लिहिलं आहे की, गुगल ट्रान्सलेट करताना अशी चूक होते.
Babar Azam made a new tweet after being cooked 🤣🤣 pic.twitter.com/qMfJO1lQ15
— RVCJ Media (@RVCJ_FB) July 12, 2024
Google translate se aisi galtiyan ho jaati hai kabhi kabhi 😜
— ये गलत बात है | Ye galat baat hai (@YGBHPAGE) July 12, 2024
जेम्स अँडरसनने 21 वर्षांच्या कसोटी क्रिकेटमधील शेवटचा सामना लॉर्ड्सवर खेळला. शेवटच्या सामन्यात 4 विकेट्स घेत आपल्या गोलंदाजीची धार दाखवून दिली. या सामन्यात विजय मिळवून जेम्स अँडरसनला विजयी निरोप देण्यात आला. नाणेफेकीचा कौल जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच वेस्ट इंडिजला 121 धावांवर रोखलं. त्यानंतर 371 धावा करत 250 धावांची आघाडी घेतली. मात्र ही आघाडी मोडून काढणं वेस्ट इंडिजला काही जमलं नाही. 136 धावांवर वेस्ट इंडिजचा डाव आटोपला आणि इंग्लंडने 114 धावांनी विजय मिळवला.
