WTC Final 2021 : बुमराहची सामन्याअगोदर बायको संजनाला मुलाखत, ‘तो’ प्रश्न विचारताच लाजेने चुर्रर्र झाला!

मुलाखत देण्यासाठी जसप्रीत बुमराह जेव्हा खोलीत गेला तेव्हा संजनाकडे पाहून तो म्हणाला, 'मी तुला या अगोदर कुठेतरी पाहिलं आहे...' बुमराहच्या या फिरकीवर संजनाला देखील हसू अनावर झालं. (Jasprit Bumrah interview Sanjana Ganesan before ICC WTC Final 2021)

WTC Final 2021 : बुमराहची सामन्याअगोदर बायको संजनाला मुलाखत, 'तो' प्रश्न विचारताच लाजेने चुर्रर्र झाला!
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन

मुंबई :  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची (WTC Final 2021) उत्सुकता आता शिगेला पोहोचलीय. खेळाडू आणि प्रेक्षक अंतिम सामन्याची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. सामन्याअगोदर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) आपली पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) हिला एक खास मुलाखत दिली. आयसीसीसाठी (ICC) ही मुलाखत घेतली गेली. आयसीसीने देखील या मुलाखतीचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केलाय. या मुलाखतीत संजनाने जसप्रीतला अनेक प्रश्न विचारले. मात्र लग्नाबद्दलचा प्रश्न विचारताच आणि लग्नाचा फोटो दाखवताच जसप्रीत बुमराह लाजेनं चुर्रर्र झाला. (Jasprit Bumrah interview Sanjana Ganesan before ICC WTC Final 2021)

मुलाखतीच्या सुरुवातीलाच जसप्रीत बायकोला म्हणाला, मी तुला कुठेतरी पाहिलंय!

मुलाखत देण्यासाठी जसप्रीत बुमराह जेव्हा खोलीत गेला तेव्हा संजनाकडे पाहून तो म्हणाला, ‘मी तुला या अगोदर कुठेतरी पाहिलं आहे…’ बुमराहच्या या फिरकीवर संजनाला देखील हसू अनावर झालं. यानंतर प्रश्नोत्तरांचा सिलसिला सुरूच राहिला. बुमराहने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडिओबद्दल संजनाने त्याला बोलतं केलं. त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या एका फोटोवरुन संजनाने प्रश्न विचारला. त्यावर ब्रिस्बेनच्या विजयानंतरचा तो ट्रॉफीसोबत फोटो असल्याचं जसप्रीतने सांगितलं.

तो प्रश्न विचारताच जसप्रीत लाजला

याच मुलाखतीत संजना गणेशन हिने त्या दोघांच्या लग्नाचे काही फोटो जसप्रीतला दाखवले. यावेळी, ‘लग्नाचा दिवस माझ्यासाठी जीवनातला सगळ्यात खास आणि आनंदाचा दिवस असल्याचा बुमराह म्हणाला. त्याचवेळी जपस्रीत जरासा लाजला. बुमराहने लग्नाचे फोटो पोस्ट करताना लिहिलेल्या कॅप्शनुरूनही संजनाने त्याला छेडलं. मी खूप दिवसांपासून कॅप्शनचा विचार करत होतो पण हे कॅप्शन तूच (संजना) दिलं होतं. जसप्रीत आणि संजनाने गोव्यामध्ये जाऊन लग्न केलं होतं. संजना मिस इंडिया फायनललिस्ट सुद्धा राहिलेली आहे. ती सध्या स्टार स्पोर्टकडून प्रेझेंटर म्हणून काम करते.

पाहा संजनाने घेतलेली मुलाखत

(Jasprit Bumrah interview Sanjana Ganesan before ICC WTC Final 2021)

हे ही वाचा :

WTC Final Weather Update : आज किती ओव्हर्सचा खेळ होणार, पाऊस पडणार का, हवामान कसं असणार? वाचा हा रिपोर्ट

WTC Final: पितृशोक असतानाही सिराजने ऐतिहासिक विजय मिळवून दिला, विराटने WTC फायनल बाहेर बसवलं!

IND vs NZ, WTC 2021 Match Prediction : विश्वविजेतेपदाची ‘कसोटी’, सामन्याचं काय चित्र असेल, विराट की केन? कोण कुणावर भारी? वाचा मॅच प्रेडिक्शन