दिनेश कार्तिक होणार टीम इंडियाचा प्रशिक्षक? या खेळाडूने सांगितलं कसं ते…

गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने दोन आयसीसी स्पर्धांमध्ये जेतेपद मिळवलं आहे. त्याचा कार्यकाळ पुढच्या वर्षी म्हणजेच 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर संपत आहे. असताना दिनेश कार्तिक या पदावर विराजमान होईल असं एका खेळाडूने भाकीत वर्तवलं आहे.

दिनेश कार्तिक होणार टीम इंडियाचा प्रशिक्षक? या खेळाडूने सांगितलं कसं ते...
दिनेश कार्तिक होणार टीम इंडियाचा प्रशिक्षक? या खेळाडूने सांगितलं कसं ते...
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 27, 2026 | 4:33 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने जेतेपद मिळवलं. आता भारतीय संघाचं पुढचं लक्ष्य हे वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा आहे. त्यासाठी प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वात पुढची रणनिती आखली जात आहे. असं असताना गौतम गंभीर निवृत्त झाल्यानंतर संघाचं प्रशिक्षकपद कोणाच्या हाती येणार हा प्रश्न आहे. त्यामुळे आतापासून चर्चा रंगल्या आहेत. या शर्यतीत दिनेश कार्तिकचं नाव आलं आहे. कसं काय ते आधी जाणून घ्या. आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि भारतीय संघाचा विकेटकीपर जितेश शर्माने एका पॉडकास्टशी बोलताना हे भाकीत वर्तवलं. त्याने सांगितलं की, गौतम गंभीरनंतर पुढचा मुख्य प्रशिक्षक दिनेश कार्तिक होऊ शकतो. जितेश शर्मा म्हणाला की, भारतीय क्रिकेट संघाने असं केलं नाही तर दिनेश कार्तिक भविष्यात दुसऱ्या कोणत्या मोठ्या देशाचा मुख्य प्रशिक्षक होऊ शकतो. कारण त्यात ती क्षमता आहे.

दिनेश कार्तिक हेड कोच होणार?

जितेश शर्माने रणवीर इलाहबादियाच्या पॉडकास्टवर बोलताना याबाबतचं भाकीत वर्तवलं. रणवीरने जितेश शर्माला विचारलं की, दिनेश कार्तिक पुढे जाऊन भारतीय संघाचा प्रशिक्षक होऊ शकतो का? त्यावर जितेश शर्माने सांगितलं की, ‘नक्कीच, होऊ शकतो. भारतच नाही तर इतर कोणत्या मोठ्या देशाचं प्रशिक्षकपद भूषवण्याची ताकद दिनेश कार्तिकमध्ये आहे. मला वाटते की, दर भारताने त्याला प्रशिक्षक केलं नाही तर तो इतर कोणत्या तरी देशाचा नक्की प्रशिक्षक होऊ शकतो.’ खरं तर दिनेश कार्तिकचा अनुभव आणि क्रिकेट जाण पाहता टीम इंडियाचा प्रशिक्षण होऊ शकतो. त्याच्या मार्गदर्शनाखालीत आरसीबीने पहिलं जेतेपद मिळवलं हे सर्वात मोठं यश आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.

Loading...

दिनेश कार्तिकने 2025 मध्ये आरसीबीचा संघ नव्याने बांधला. यापूर्वी संघाची स्थिती फार काही चांगली नव्हती. गेल्या 17 वर्षांपासून जेतेपदासाठी झुंजत होते. पण दिनेश कार्तिकने संघाची कमकुवत बाजू ओळखली आणि त्यानुसार रणनिती आखली. चांगले गोलंदाज संघात घेतले आणि संघाला जेतेपद मिळवून देण्याचा मोलाचा वाटा उचलला. आरसीबीला पहिलं जेतेपद मिळवून देण्यात दिनेश कार्तिकचा मोलाचं सहकार्य आहे. दिनेश कार्तिक द हंड्रेड स्पर्धेत लंडन स्पिरिट संघाचा कोच आणि मेंटॉर आहे. त्यामुळे दिनेश कार्तिक हा टीम इंडियाची धुरा सांभाळण्यास सक्षम आहे. आता बीसीसीआय 2027 नंतर कोणाच्या नावाचा विचार करेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us