AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PSL 2026 : पांढरा चेंडू अचानक झाला गुलाबी! पाकिस्तानात सामना सुरू असताना झालं असं की…

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. लाहोर कलंदर्स आणि हैदराबाद किंग्समॅन यांच्यात पहिला सामना सुरू होता. या सामन्यातील पहिला डाव सुरू असताना अचानक पांढरा चेंडू गुलाबी झाला. नेमकं काय झालं ते जाणून घ्या

PSL 2026 : पांढरा चेंडू अचानक झाला गुलाबी! पाकिस्तानात सामना सुरू असताना झालं असं की...
PSL 2026 : पांढरा चेंडू अचानक झाला गुलाबी! पाकिस्तानात सामना सुरू असताना झालं असं की...Image Credit source: X
| Updated on: Mar 27, 2026 | 4:03 PM
Share

Lahore Qalandars vs Hyderabad Kingsmen: पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत लाहोर कलंदर्स आणि हैदराबाद किंग्समॅन यांच्यात झालेल्या लढतीत एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. गद्दाफी स्टेडियममध्ये हा सामना सुरू होता. या सामन्यात हैदराबाद किंग्समॅन संघ फिल्डिंग करत होता तेव्हा पांढरा चेंडूचा रंग अचानक गुलाबी झाला. त्यामुळे सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. या प्रकारामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची जगभरात नाचक्की होत आहे. इतकंच काय तर या प्रकारावून सोशल मीडियावर मीम्स तयार होत आहेत. पण असं का झालं त्यावरूनही चर्चांना उधाण आलं. त्याचं कारण असं की हैदराबाद किंग्समॅन संघाच्या जर्सीचा रंग चेंडूला लागला होता. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील नवा संघ असलेल्या हैदराबाद किंग्समॅनने आपल्या खेळाडूंना दिलेल्या जर्सीची क्वॉलिटी काही चांगली नाही. त्यामुळे त्या जर्सीचा रंग चेंडूला लागला आणि चेंडू गुलाबी झाला.

पाकिस्तानात खराब जर्सीचं प्रकरण काही पहिलं नाही. यापूर्वीही जर्सीवरून बराच गोंधळ उडाला आहे. खराब दर्जाच्या जर्सीमुळे खेळाडूंना अधिक घाम सुटतो. त्यामुळे पाकिस्तान आणि तिथल्या व्यवस्थापन कायम चर्चेत असतं. हैदराबाद किंग्समॅनच्या खेळाडू चेंडूला चमक आणण्यासाठी जर्सीवर घासत होते. तेव्हा हळू चेंडू गुलाबी होत गेला. त्यामुळे पंचांना याची दखल घ्यावी लागली. त्यांनी चेंडूची तपासणी केली आणि चेंडू बदलला. चेंडू बदलताना पंचांच्या हातात असं वाटते की दोन चेंडू आहे. एका चेंडूचा रंग पांढरा आणि दुसऱ्या चेंडूचा रंग गुलाबी झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.

काय झालं पहिल्या सामन्यात?

पाकिस्तान प्रीमियर लीग स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात लाहोर कलंदर्सने 20 षटकात 199 धावा केल्या. फखर जमाने 29 चेंडूत 53 धावा केल्या. तर मोहम्मद नईमने 19 चेंडूत 30 धावांची खेळी केली. मधल्या फळीत आलेल्या विकेटकीपर हसीबुल्लाह खानने 28 चेंडूत 40 धावा केल्या. तर झिम्बाब्वेच्या सिकंदर राझाने 10 चेंडूत 24 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना हैदराबाद किंग्सचा संघ फक्त 130 धावा करू शकला. पहिल्याच सामन्यात 69 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

Follow Us
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय