Mumbai Indians | ‘पलटण’साठी आनंदाची बातमी, टीममध्ये घातक गोलंदाजाची एन्ट्री

आयपीएलच्या 16 व्या मोसमाआधी मुंबई इंडियन्सला मोठी गूडन्युज मिळाली आहे. मु्ंबईच्या टीममध्ये मॅचविनर खेळाडूची एन्ट्री झाली आहे. मुंबई इंडियन्सने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

Mumbai Indians | 'पलटण'साठी आनंदाची बातमी, टीममध्ये घातक गोलंदाजाची एन्ट्री
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 3:58 PM

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमाचं काउंटडाऊन सुरु झालंय. या मोसमाला येत्या 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. एक एक दिवस जसा जसा जवळ येतोय, त्यानुसार अनेक परदेशी खेळाडू हे आपल्या टीमसोबत जोडले जात आहेत. तसेच दुसऱ्याबाजूला अनेक खेळाडू हे या पर्वाआधीच दुखापतीमुळे या मोसमातून बाहेर पडलेत. त्यामुळे संबंधित टीम मॅनेजमेंट टेन्शनमध्ये आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीमला मोठा दिलासा मिळाला आहे. टीममध्ये अनुभवी गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे. या खेळाडूला दुखापतीमुळे या मोसमाला मुकावं लागण्याची शक्यता होती. मात्र अखेर हा गोलंदाज खेळण्यासाठी सज्ज झालाय. संघ प्रशासनाकडून मॅचविनर खेळाडू परतल्याचं ट्विटद्वारे सांगण्यात आलंय.

मुंबई इंडियन्सने ट्विट करत बॉलरची एन्ट्री झाल्याचं सांगितलंय. या ट्विटमध्ये या बॉलरचं मुंबई इंडियन्सच्या जर्सीतील पाठमोरा फोटो आहे. तसेच ‘कोण आला रे?’, या कॅप्शनसह फोटो शेअर करत चाहत्यांना तो खेळाडू कोण आहे, हे ओळखण्यास प्रवृ्त्त केलं आहे.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सामिल झाला आहे. मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुखापीमुळे या हंगामात खेळण्यास असमर्थ आहे. त्यामुळे मुंबईचं टेन्शन वाढलेलं. त्यात जोफ्रा खेळू शकणार नसल्याची चर्चा होती. त्यामुळे मुंबईची चिंता वाढलेली. पण जोफ्रा आयपीएलसाठी उपलब्ध असेल, अशी माहिती काही दिवसांपूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली. त्यात आता त्याचं आगमन झालंय. यामुळे मुंबईला काही प्रमाणात दिलासा मिळालाय.

हे सुद्धा वाचा

दरम्यान मुंबई या मोसमातील आपला पहिला सामना हा बंगळुरु विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 2 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम

मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने एकूण 15 मोसमांपैकी 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा एकूण 5 पर्वांमध्ये आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मुंबईच्या गोटात यावेळेस आणखी अनुभवी खेळाडू दाखल झाले आहेत.

अनुभवी आणि यशस्वी कर्णधार

रोहित आयपीएल स्पर्धेतील यशस्वी संघाचा यशस्वी कर्णधार आहे. रोहित 2013 पासून म्हणजेच गेल्या 8 मोसमांपासून मुंबईचे नेतृत्व करतोय. यामध्ये त्याने मुंबईला 8 पैकी 5 वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. रोहित कॅपटन्सीसोबत एक अफलातून फलंदाजदेखील आहे.

मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.