आयपीएल आधी जॉस बटलरचा इशारा, म्हणतो, ‘या बॅट्समनपासून सावध रहा नाहीतर चिंधड्या उडवेन..!’

बेन स्टोक्स त्याचा हाच फॉर्म आगामी आयपीएलच्या 14 व्या हंगामात देखील कायम ठेवेल, असा विश्वास बटलरने व्यक्त केला आहे. | Jos ButlerBen Stokes

आयपीएल आधी जॉस बटलरचा इशारा, म्हणतो, 'या बॅट्समनपासून सावध रहा नाहीतर चिंधड्या उडवेन..!'
Jos Butler
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 8:16 AM

पुणे : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सची (Ben Stokes) गणना आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. त्याच्याकडे बॉल आणि बॅटने सामना पलटवण्याची ताकद आहे. शुक्रवारी त्याने भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आणखी एक तुफानी डाव खेळत इंग्लंड संघाला जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तो ज्या प्रकारच्या फॉर्मात आहे ते पाहून बोलर्स घाबरु शकतात, अशी परिस्थिती आहे. केवळ 52 चेंडूत त्याने 10 षटकार ठोकत 99 धावा काढल्या. त्याची हीच फलंदाजी येत्या आयपीएलमध्येही पाहायला मिळू शकते, असं म्हणत इंग्लंडचा उपकर्णधार जॉस बटलरने (Jos Butler) गोलंदाजांना इशारा दिलाय. (Jos Butler Warns IPL 2021 bowler over Ben Stokes Batting performance)

बेन स्टोक्स त्याचा हाच फॉर्म आगामी आयपीएलच्या 14 व्या हंगामात देखील कायम ठेवेल, असा विश्वास बटलरने व्यक्त केला आहे. बटलर आणि स्टोक्स हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून (Rajsthan Royals) खेळतात.

स्टोक्सची वादळी इनिंग

पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात स्टोक्सला फलंदाजीला वरच्या क्रमाकांवर पाठवलं गेलं. दुसर्‍या वनडे सामन्यात 10 षटकारांसह 99 धावा करत त्याने झंझावाती खेळी केली. त्याचं शतक केवळ एका धावेने हुकलं. दुसऱ्या सामन्यात भारताने 336 धावा ठोकल्या. परंतु इंग्लंडने हे लक्ष्य सहज पूर्ण केलं. अवघ्या 43.3 ओव्हर्समध्ये इंग्लंडने हे अवघड वाटणारं लक्ष्य गाठून भारताचा 6 विकेट्सने पराभव केला.

बेन स्टोक्सला बोलिंग करणं घातक

तो ज्या प्रकारच्या फॉर्ममध्ये आहे त्यानुसार बेन स्टोक्सला बोलिंग करणं घातक असल्याचं मत जॉस बटलरने मांडलं आहे. मला आशा आहे की त्याचा हाच फॉर्म तो आयपीएलमध्येही ठेवेन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो बॉल आणि बॅटने काय कमाल करु शकतो. संघाला जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा त्याने बोलिंग आणि बॅटिंगने कमाल खेळी खेळल्या आहेत. पाठीमागच्या काही वर्षात त्याच्या फलंदाजीमध्ये खूपच सुधारणा झाली आहे. तिसऱ्या क्रमाकांवर त्याला खेळताना पाहून चांगलं वाटतं. त्याला फलंदाजीसाठी अधिक वेळ मिळतो. एकदा का जम बसला की मग तो आक्रमक फटके खेळण्यास कचरत नाही, असं बटलर म्हणाला.

प्रतिभेची अजिबात कमी नाही

आमच्या टीममध्ये प्रतिभेची अजिबात कमी नाही. तसंच कुणीही कोणत्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरावं, याचा जास्त फरक पडत नाही. मला सारखं सारखं विचारलं जातं की तू कोणत्या क्रमांकांवर फलंदाजी करणार, तसंच जॉनी बेअरस्टो कोणत्या नंबरला खेळणार.. मला वाटतं मर्यादित ओव्हर्ससाठी आमच्याकडे खूप प्रतिभावान खेळाडू आहेत जे कमी बॉलमध्ये अधिक धावा ठोकू शकतात. तसंच निवड समितीसमोरही अनेक पर्याय आहेत.

हे ही वाचा :

Ind vs Eng : तिसऱ्या सामन्यात या दोन खेळाडूंना डच्चू?, मालिका विजयासाठी विराट सेनेची नवी रणनीती!

KL Rahul : दोन्ही डोळे बंद, हात कानाला, के एल राहुलच्या शतकी सेलिब्रेशनचा अर्थ काय? ‘राज की बात’ त्याच्याकडून…

Non Stop LIVE Update
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.