Kapil Dev: ‘असा खेळाडू शतकात एकदाच होतो’, टीम इंडियातील एका प्लेयरबद्दल कपिल देव यांचं मोठं विधान

दीनानाथ मधुकर परब, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 09, 2023 | 1:32 PM

"मी डिविलियर्स, विवियन रिचर्ड्स, सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रिकी पॉन्टिंगसारखे महान बॅट्समन पाहिलेत. पण फार कमी जण इतक्या सहजेने चेंडूला हिट करतात"

Kapil Dev: 'असा खेळाडू शतकात एकदाच होतो', टीम इंडियातील एका प्लेयरबद्दल कपिल देव यांचं मोठं विधान
Kapil dev

Indian Cricket Team: भारतीय टीमने 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिला वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. कपिल देव यांची भारताचे महान कर्णधार आणि खेळाडूंमध्ये गणना होते. कपिल देव हे आपल्या स्पष्टवक्ते स्वभावासाठी ओळखले जातात. क्रिकेटशी संबंधित मुद्यांवर ते बिनधास्तपणे आपली मत मांडतात. आता कपिल यांनी भारतीय क्रिकेटमधील सुपरस्टार सूर्यकुमार यादवबद्दल विधान केलय. असा खेळाडू शतकात एकदाच होतो, असं कपिल सूर्याच कौतुक करताना म्हणाले.

कधी-कधी मला शब्द कमी पडतात

“त्याच्या इनिंगच वर्णन करायला कधी-कधी मला शब्द कमी पडतात. जेव्हा आपण सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहलीला पाहतो, त्यावेळी पुन्हा कधी असा खेळाडू पहायला मिळेल असा मनात विचार येतो” कपिल देव एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

कपिल देव काय म्हणाले?

“भारतात भरपूर टॅलेंट आहे. सूर्या ज्या पद्धतीच क्रिकेट खेळतोय, त्याला तोड नाहीय. फाइन लेगच्या वरुन शॉट मारतो. त्यामुळे गोलंदाज घाबरतो. तो तिथे उभा राहून मिड ऑन आणि मिड विकेटला सिक्स मारु शकतो. तो गोलंदाजाची लाइन आणि लेंथ बिघडवून टाकतो” असं कपिल देव म्हणाले.

असा खेळाडू शतकात एकदाच होतो

“मी डिविलियर्स, विवियन रिचर्ड्स, सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रिकी पॉन्टिंगसारखे महान बॅट्समन पाहिलेत. पण फार कमी जण इतक्या सहजेने चेंडूला हिट करतात. सूर्यकुमार यादवला सलाम. असा खेळाडू शतकात एकदाच होतो” असं कपिल देव म्हणाले.

सूर्याच तुफानी शतक

श्रीलंकेविरुद्ध राजकोटमध्ये सूर्यकुमार यादवने तुफानी बॅटिंग केली. त्याने फक्त 51 चेंडूत 112 धावांची शतकी खेळी केली. टीम इंडियाने पाच विकेट गमावून 228 धावांचा डोंगर उभारला. श्रीलंकेची टीम 137 रन्सवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाने सीरीज 2-1 अशी जिंकली.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI