इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय खेळाडूने लिहिली भावूक पोस्ट, रिटायरमेंटबाबत चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका रोमहर्षक झाली. या मालिकेत दोन्ही संघांनी तुल्यबल सामना केला. पण इंग्लंडला त्यांच्यात मैदानात कसोटी मालिकेत 2-2 ने बरोबरीत सोडवणं मोठी बाब आहे. असं असताना एक खेळाडूच्या पोस्टने खळबळ उडाली आहे.

इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय खेळाडूने लिहिली भावूक पोस्ट, रिटायरमेंटबाबत चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा
इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय खेळाडूने लिहिली भावूक पोस्ट, रिटायरमेंटबाबत चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा
Image Credit source: BCCI
Updated on: Aug 07, 2025 | 4:25 PM

इंग्लंड दौऱ्यात खऱ्या अर्थाने शुबमन गिलच्या नेतृत्वाचा कस लागला होता. पण त्या लिटमस टेस्टमध्ये शुबमन गिल पास झाला आहे. आता पुढचा कसोटी सामना ऑक्टोबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय भूमीत होणार आहे. असं असताना काही खेळाडूंवर गच्छंतीची टांगती तलवार आहे. असं असताना कसोटी क्रिकेटमध्ये आठ वर्षानंतर कमबॅक करणाऱ्या खेळाडूची पोस्ट चर्चेत आहे. त्याला कारणही तसंच आहे. या मालिकेत शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी शतकी खेळी केली. पण करूण नायरची बॅट काही चालली नाही. त्याला कसोटीत फक्त एकच अर्धशतक झळकावता आलं. त्यामुळे पुढच्या मालिकेतून त्याचा पत्ता कट असेल अशी चर्चा क्रीडावर्तुळात रंगली आहे. आता त्याने सोशल मीडियावर केलेल्या एक पोस्टने खळबळ उडाली आहे. त्याची पोस्ट भावुक असली तरी त्या खाली चाहत्यांनी रिटायरमेंटच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्याने निवृत्ती घेतली नसली तरी चाहत्यांनी तसा अर्थ काढला आहे.

करूण नायरने काय लिहिलं आहे?

करूण नायरने आपल्या इंस्टाग्राम पेजवर एक पोस्ट करत लिहिलं की, जिथे प्रत्येक धाव कठोर परिश्रम असते आणि प्रत्येक विकेट एक बक्षीस असते. ती तुमच्या मनाला, शरीराला आणि आत्म्याला आव्हान देते – दिवसरात्र. गेल्या काही महिन्यांत, आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न केले आणि या संघाने उद्देशपूर्ण संघर्ष म्हणजे काय हे दाखवून दिले? कोणताही शॉर्टकट नाही, फक्त योग्य प्रयत्न आणि संघाचा अभिमान आणि एक उत्तम शेवट. काय प्रवास होता!”.

करूण नायरच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. एका चाहत्याने प्रतिक्रिया लिहिताना निवृत्तीचा शुभेच्छा दिल्या. यानंतर त्याच्या निवृत्तीबाबत चर्चांना उधाण आलं. पण करूण नायरने असं काहीच सांगितलेलं नाही. त्यामुळे त्याला अजूनही वेस्ट इंडिज दौऱ्यात संधी मिळण्याची अपेक्षा आहे. कारण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. पण त्याच्या मनात नेमकं काय सुरु आहे हे आता सांगणं कठीण आहे. दरम्यान, इंग्लंड दौऱ्यात करूण नायरने 8 डावात 25 च्या सरासरीने 205 धावा केल्या. यात फक्त एक अर्धशतक आहे.

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत फलंदाजीत पदरी निराशा पडल्यानंतर करूण नायर दुलीप ट्रॉफीतून बाहेर होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात फिल्डिंग करताना करूण नायरच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यात थोडं फ्रॅक्चर आहे.. त्यामुळे दुलीप ट्रॉफी खेळणं कठीण आहे. ही स्पर्धा 28 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.