AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, Orange Cap : केकेआरचा मुंबईवर 52 धावांनी विजय, ऑरेंज कॅपचे टॉप फाईव्ह स्पर्धक जाणून घ्या

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कालच्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय, पाहुया...

IPL 2022, Orange Cap : केकेआरचा मुंबईवर 52 धावांनी विजय, ऑरेंज कॅपचे टॉप फाईव्ह स्पर्धक जाणून घ्या
ऑरेंज कॅपमधील टॉप पाच खेळाडू बघितल्यास पहिल्या स्थानी जॉस बटलर कायम आहे.Image Credit source: twitter
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: May 10, 2022 | 6:39 AM
Share

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये सोमवारी झालेल्या केकेआर (KKR) विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या (MI) सामन्यात केकेआरने मुंबईवर 52 धावांनी मोठा विजय मिळवला. कोलकात्याच्या 166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा डाव 113 धावात आटोपला. त्यामुळे केकेआरच्या धावगतीत सुद्धा सुधारणा झाली आहे. इशान किशनने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. पण त्यात T 20 क्रिकेटला साजेसा वेग नव्हता. त्याने 43 चेंडूंमध्ये 51 धावा केल्या. मुंबई इंडियन्सला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. कॅप्टन रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. अवघ्या 2 रन्सवर साउदीने रोहितला जॅक्सनकरवी झेलबाद केलं. तिलक वर्माही फार वेळ टिकला नाही. त्याला अवघ्या 6 रन्सवर रसेलने बाद केलं. मागचे दोन सामने मुंबई इंडियन्सला जिंकून देणारा टिम डेविड चमकला नाही. वरुण चक्रवर्तीच्या फिरकीने त्याला चकवलं. डेविडने 9 चेंडूत 13 धावा केल्या. या खेळीत तीन चौकार होते. पॅट कमिन्सने एकाच ओव्हरमध्ये इशान किशन, डॅनियल सॅम्स आणि मुरुगन अश्विन यांच्या विकेट काढल्या. कालच्या केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या यादीत काय बदल झालाय पाहुया…

ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये जोस बटलर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये पहिल्या स्थानी कायम आहे. त्याने या सीजनमध्ये आतापर्यंत 618 धावा काढल्या आहेत. दुसऱ्या स्थानी केएल राहुल आहे. राहुलने आयपीएलच्या या सीजनमध्ये 451 धावा काढल्या आहेत.त्यानंतर तिसऱ्या फाफ डु प्लेसिस असून त्याने 389 धावा काढल्या आहेत. चौथ्या स्थानी शिखर धवन आहे. शिखरने 381 धावा तर पाचव्या स्थानी असलेल्या डेव्हिड वॉर्नरने 375 धावा आयपीएलच्या या सीजनमध्ये काढल्या आहेत.

ऑरेंज कॅपचा टेबल

फलंदाज धावा
जोस बटलर718
केएल राहुल 537
डी कॉक502
शिखर धवन460
हार्दिक पांड्या453

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

पॉइंटस टेबलची स्थिती समजून घ्या

KKR ला कालच्या सामन्यात विजय आवश्यक होता. त्यांच्यासाठी हा सामना ‘करो या मरो’ होता. पॉइंटस टेबलमध्ये केकेआरचा संघ नवव्या स्थानावर होता. मुंबई विरुद्धच्या विजयानंतर केकेआरची टीम सातव्या स्थानावर आली आहे. चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सला नमवल्यानंतर केकेआरची नवव्या स्थानावर घसरण झाली होती. प्लेऑफचं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी केकेआरला कालच्या सामन्यात विजय आवश्यक होता. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून रहाव लागेल. आता दिल्ली, एसआरएच, पंजाब आणि कोलकाता तिन्ही टीम्सचे समान 10 पॉइंटस आहेत.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं