AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR IPL 2024 Winner : KKR च्या विजयात फक्त गौतम गंभीरच नाही, ‘या’ मुंबईकराच खास योगदान

KKR IPL 2024 Winner : कोलकाता नाइट रायडर्सने 10 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा आयपीएलचा किताब जिंकला. कोलकाताच्या या विजयात मेंटॉर म्हणून आलेल्या गौतम गंभीर यांचा महत्त्वाचा रोल आहे. पण त्या शिवाय अजूनही एक व्यक्ती आहे, टीमच्या खेळाडूंनी त्याला सुद्धा विजयाच श्रेय दिलं.

KKR IPL 2024 Winner : KKR च्या विजयात फक्त गौतम गंभीरच नाही, 'या' मुंबईकराच खास योगदान
KKR Team MembersImage Credit source: KKR
| Updated on: May 27, 2024 | 8:09 AM
Share

कुठलीही टीम चॅम्पियन बनते, तेव्हा त्या टीमच्या यशामध्ये काही खेळाडू जास्त चमकतात. या खेळाडूंची सर्वाधिक चर्चा होते. त्यांचं कौतुक होतं. पण हे पूर्ण सत्य नाहीय. कुठल्याही टीमला चॅम्पियन बनवण्यात छोट्या-छोट्या खेळाडूंच योगदान सुद्धा महत्त्वाच असतं. आयपीएल 2024 च्या सीजनच विजेतेपद मिळवणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सच्या टीममध्ये असाच एक चेहरा आहे, ज्याने अनेक खेळाडूंना बदललय. कोलकाता नाइट रायडर्सच्या टीमने 10 वर्षानंतर पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफी उंचावली. रविवारी 26 मे रोजी चेन्नईमध्ये फायनल झाली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली KKR टीमने हैदराबादच्या टीमला 8 विकेटने हरवून तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. कोलकाताच्या या विजयात सर्वाधिक चर्चा माजी कॅप्टन गौतम गंभीरची होती. त्याने मेंटॉर म्हणून येऊन टीमला चॅम्पियन बनवलं. त्याशिवाय सुनील नरेन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती या खेळाडूंनी सुद्धा उत्तम कामगिरी केली.

त्याशिवाय केकेआरच्या टीममध्ये असा एक व्यक्ती होता, ज्याने टीमला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. फायनल जिंकल्यानंतर वरुण चक्रवर्ती आणि वेंकटेश अय्यर यांनी त्याचा उल्लेख केला. ही व्यक्ती आहे, टीमचे बॅटिंग कोच अभिषेक नायर. मागच्या तीन-चार सीजनपासून अभिषेक नायर केकेआरचे बॅटिंग कोच आहेत. अनेक खेळाडूंना तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय.

त्या दोघांनी गंभीरला नाही, मग कोणाला दिलं श्रेय?

टीमच्या विजेतेपदात अभिषेक नायर यांची महत्त्वाची भूमिका होती, हे फायनल जिंकल्यानंतर वरुण चक्रवर्तीने मान्य केलं. तेच फायनलमध्ये वेंकटेश अय्यरने 26 चेंडूत 52 धावा फटकावल्या. वेंकटेश अय्यर म्हणाला की, लोकांच काही गोष्टींवर लक्ष जात नाही. पण मी असं होऊ देणार नाही. वेंकटेशने आपल्या बॅटिंगमध्ये झालेल्या सुधारणेच क्रेडिट अभिषेक नायर यांना दिलं.

रोहित शर्मा, दिनेश कार्तिकने सुद्धा घेतलीय मदत

याआधी सुद्धा मुंबईचे माजी फलंदाज अभिषेक नायर यांनी अनेकांच्या फलंदाजीत सुधारणा घडवून आणली. दिनेश कार्तिकपासून रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या दिग्गजांनी करिअरमध्ये वेगवेगळ्या प्रसंगी अभिषेक नायर यांची मदत घेतली आहे. आपल्या बॅटिंगमधील सुधारणेसाठी अभिषेक नायर यांना क्रेडिट दिलं. कोलकाताला पुन्हा चॅम्पियन बनवण्याच श्रेय अभिषेक नायर यांना सुद्धा जातं.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना