AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तू असं बोलू शकत नाही…’ केएल राहुल थेट पंच कुमार धर्मसेनाला भिडला, भर मैदानात राडा Watch Video

India vs England 5th Test: पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडचा फलंदाजी संघ फलंदाजी करत होता. पण तेव्हा अचानक केएल राहुल आणि पंच कुमार धर्मसेना आमनेसामने आले. या भांडणाचं कारण एक भारतीय खेळाडू होता.

'तू असं बोलू शकत नाही...' केएल राहुल थेट पंच कुमार धर्मसेनाला भिडला, भर मैदानात राडा Watch Video
केएल राहुल थेट पंच कुमार धर्मसेनाला भिडला, भर मैदानात राडा Watch VideoImage Credit source: Getty Images
| Updated on: Aug 01, 2025 | 11:00 PM
Share

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना लंडनच्या ओव्हल मैदानात सुरु आहे. दुसऱ्या दिवशीच पहिल्या डावाचा खेळ संपला आहे. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारताने सर्व विकेट गमवून 224 धावा केल्या. तर इंग्लंडचा संघ 247 धावांवर तंबूत परतला. इंग्लंडकडे पहिल्या डावात 23 धावांची आघाडी आहे. आता भारतीय संघ दुसऱ्या डावात किती धावा करतो याकडे लक्ष लागून आहे. असं असताना भारतीय संघ गोलंदाजी करत असताना भर मैदानात राडा झाला. लॉर्ड्स कसोटी सामन्यापासून प्रत्येक कसोटी सामन्यात काही ना काही घडत आहे. आता शेवटच्या कसोटी सामन्यातही तसंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. पण यावेळी दोन्ही संघांचे खेळाडू नाही तर पंचांशी वाद झाला. उपकर्णधार केएल राहुल आणि श्रीलंकन पंच कुमार धर्मसेना यांच्यात वादावादी झाली.

भारताने पहिल्या डावात केलेल्या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने दमदार सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारतीय संघ बॅकफूटवर गेला होता. विकेट पडल्यानंतर भारतीय संघावरील दबाव स्पष्ट दिसत होता. असं असताना इंग्लंड फलंदाजी करत असताना 22 व्या षटक प्रसिद्ध कृष्णा टाकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जो रूटला फसला. त्यानंतर प्रसिद्धने जो रूटला काही बोलला. त्यावर जो रूटने सौम्य प्रतिक्रिया दिली. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर जो रूटने चौकार मारल आणि प्रसिद्ध कृष्णा पुन्हा काही पुटपुटला. त्यामुळे रूट भडकला आणि त्याने प्रसिद्ध कृष्णाला रागाच्या भरात उत्तर दिलं.

हा प्रकार घडत असताना पंच धर्मसेना आणि केएल राहुल यांच्यात वादाची ठिणगी पडली. रुट-प्रसिद्ध यांच्यात वाद वाढत असताना पंच धर्मसेनाने थांबवलं. तसेच प्रसिद्ध असं करून नकोस अशी ताकीद दिली. केएल राहुलला ही बाब खटकली. त्याने पंच धर्मसेनावर प्रश्नांचा भडिमार केला. भारतीय संघ गप्प बसेल का?

  • केएल राहुल : तुम्हाला काय वाटतं? आम्ही गप्प राहायचं?
  • धर्मसेना : तुला आवडेल का? गोलंदाज तुझ्याजवळ येऊन काहीही बोललं तर..नाही.. तुम्ही असं करू शकत नाही.
  • धर्मसेना : नाही राहुल, आपण असं करता कामा नये.
  • केएल राहुल : तुम्हाला आमच्याकडून काय हवं आहे? आम्ही फक्त बॅटिंग करायची, बॉलिंग करायची आणि घरी जायचं?
  • धर्मसेना : सामना संपल्यानंतर आपण यावर चर्चा करू. तुम्ही अशा पद्धतीने बोलू शकत नाही.

पंच धर्मसेना आधीच एका कृत्यामुळे या सामन्यात क्रीडाप्रेमींच्या रडारवर आला आहे. आता या वादानंतर पंच धर्मसेना भारतीय ओपनर आणि गोलंदाजाविरुद्ध कारवाई करणार का? क्रिकेट नियमानुसार, कोणताही खेळाडू पंचांच्या निर्णयाविरुद्ध प्रश्न उपस्थित करू शकत नाही. पंचांशी वाद घालू शकत नाही. असं केल्यास खेळाडूला शिक्षा होऊ शकते. इतकंच काय डिमेरिट पॉइंटही जोडला जाऊ शकतो.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.