AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Athiya Shetty-KL Rahul Wedding – BCCI, IPL आणि जाहीरातींमधून किती कमावतो केएल राहुल? जाणून घ्या नेटवर्थ

Athiya Shetty-KL Rahul Wedding - बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत केएल राहुल विवाहबद्ध होणार आहे. सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर हे लग्न होणार आहे. सुनील शेट्टी सुद्धा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे.

Athiya Shetty-KL Rahul Wedding - BCCI, IPL आणि जाहीरातींमधून किती कमावतो केएल राहुल?  जाणून घ्या नेटवर्थ
KL Rahul-Athiya ShettyImage Credit source: instagram
| Updated on: Jan 23, 2023 | 11:35 AM
Share

Athiya Shetty-KL Rahul Wedding – टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू केएल राहुल आज आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करणार आहे. स्टार क्रिकेटर राहुल आज विवाह बंधनात अडकणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत केएल राहुल विवाहबद्ध होणार आहे. सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर हे लग्न होणार आहे. सुनील शेट्टी सुद्धा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. मागच्या दोन-तीन वर्षांपासून केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या प्रेमसंबंधांची मीडियामध्ये चर्चा होती. आज हे नातं जन्मो-जन्मीसाठी विवाहाच्या पवित्र बंधनात बांधल जाणार आहे.

राहुलला दरवर्षी मिळतात 5 कोटी

या विवाहसोहळ्यासाठी खूप जवळच्या लोकांना बोलवण्यात आलं आहे. हे लग्न खूप सिक्रेट ठेवण्याचा प्रयत्न झाला. पण लग्नाची चर्चा मागच्या बऱ्याच दिवसापासून सुरु होती. राहुलच्या नेटवर्थबद्दल बोलायच झाल्यास, तो बीसीसीआय, आयपीएल करार आणि जाहीरातींमधून कोट्यवधी रुपये कमावतो. राहुलचा बीसीसीआयच्या ए ग्रेड कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश होतो. त्यासाठी राहुलला दरवर्षी 5 कोटी रुपये मिळतात.

एकूण संपत्ती किती कोटीची?

केएल राहुल आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन आहे. लखनौने त्याला 17 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. केएल राहुल अनेक ब्रँडससाठी जाहीरात करतो. त्याची एकूण संपत्ती 75 कोटीच्या घरात आहे.

केएल राहुलची ढासळती कामगिरी

केएल राहुल लग्न करतोय ही चांगली बाब आहे. पण क्रिकेटच्या मैदानात त्याची कामगिरी तितकी उत्साहवर्धक नाहीय. त्याला सातत्याने टीममधून बाहेर करण्याची मागणी होत आहे. त्याचा फॉर्म तितका चांगला नाहीय. इतर खेळाडूंच्या तुलनेत केएल राहुलला जास्त संधी दिली जातेय, असं अनेकांच म्हणणं आहे. याच खराब फॉर्ममुळे त्याला उपकर्णधारपद गमवाव लागलं आहे. केएल राहुलचा कॅप्टनशिपसाठी विचार सुरु होता. पण ढासळत्या कामगिरीमुळे त्याला आता संघातील स्थान टिकवून ठेवण कठीण जातय. केएल राहुलच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही, तर त्याला टीममधून आपलं स्थान गमवाव लागू शकतं. ते दोघे संधीच्या प्रतिक्षेत

यंदा वनडे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. केएल राहुल हेड कोच राहुल द्रविड आणि रोहित शर्माच्या योजनेचा भाग आहे. त्यामुळे त्याला वनडेमध्ये सातत्याने संधी मिळतेय. इशान किशन, संजू सॅमसन हे आक्रमक बॅट्समनही संधीच्या प्रतिक्षेत आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.