
भारतीय संघाची क्रिकेटमध्ये फिरकीला योग्य रितीने खेळणारे खेळाडू म्हणून ख्याती होती. पण आता तीच ताकद कमकुवत झाल्याचं दिसून येत आहे. कारण फिरकीचा सामना करताना पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची दाणादाण उडाली होती. हा सामना भारताने 30 धावाने गमावला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने फलंदाजीला पूरक अशी विकेट बनवली. पण येथेही भारतीय फलंदाजांनी माती खाल्ली. एकीकडे दक्षिण अफ्रिकन गोलंदाज सहज खेळले. तर भारतीय गोलंदाज 201 धावा करून बाद झाले. दुसऱ्या डावात भारताची स्थिती नाजूक आहे. हातात 8 विकेट असून अजून 522 धावांचा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे पराभव निश्चित दिसत आहे. असं असताना चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 2 गडी गमवून 27 धावा केल्या. यात केएल राहुलची विकेट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. हार्मरने टाकलेल्या जादुई चेंडूवर केएल राहुलला बाद होण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.
सायमन हार्मरने दहाव्या षटकात आपल्या फिरकीची जादू दाखवली. त्याने या षटकात दुसरा चेंडू केएल राहुलला ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकला. हा चेंडू सहज खेळून काढेल असं केएल राहुलला वाटलं. पण टप्पा पडला आणि चेंडू आत घुसला. काही कळायच्या आतचं स्टम्प घेऊन गेला. खरं तर केएल राहुलला काही क्षण काय झालं हेच कळलं नाही. पण चेंडू जबरदस्त टर्न होऊन स्टम्प घेऊन गेला होता. त्यामुळे मान खाली घालून तंबूत जाण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता.
What a ball by Simon Harmer. He has been the best spinner of the series by far, outshining Ravindra Jadeja and Kuldeep Yadav 👏 #INDvsSApic.twitter.com/0juwX4f7P7
— Kusha Sharma (@Kushacritic) November 25, 2025
गुवाहाटी कसोटीच्या दुसऱ्या डावातही वनडे कर्णधार केएल राहुल फेल गेला. त्याला फक्त 6 धावाच करता आल्या. यासह त्याने नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून सर्वाधिक वेळा एकेरी धावांवर बाद होणारा फलंदाज ठरला आहे. केएल राहुल 0 ते 9 धावांच्या मध्ये एकंदरीत 39 वेळा बाद झाला आहे. यासह त्याने विराट कोहलीला मागे टाकलं आहे. केएल राहुलची अशी कामगिरी पाहता कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक वेळा अपयशी ठरल्याचं दिसत आहे. त्याच्याकडे खेळण्याची चांगली कला असूनही अशा पद्धतीचा रेकॉर्ड पाहून क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे.