IND vs BAN: एडिलेडमध्ये त्याने बूट पुसून मिळवून दिला विजय, रघु राघवेंद्रच टीम इंडियाशी काय नातं?
IND vs BAN: कोण आहे हा रघु राघवेंद्र? बांग्लादेशवरील विजयात त्याचं सुद्धा महत्त्वाच योगदान.

एडिलेड: टीम इंडियाने काल मस्ट वीन मॅचमध्ये बांग्लादेशवर 5 रन्सने विजय मिळवला. एडिलेड ओव्हलच्या मैदानात मिळवलेला हा विजय टीम इंडियाच्या सेमीफायनल प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. टीम इंडियाच्या कालच्या विजयात विराट कोहलीबरोबर सांघिक प्रयत्न होते. त्याचबरोबर मैदानाबाहेर असलेल्या एका व्यक्तीने टीम इंडियाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. त्याचं नाव आहे रघु राघवेंद्र.
रघुने कुठलाही त्रास होऊ दिला नाही
रघु राघवेंद्रने कालच्या मॅचमध्ये खेळाडूंचे बूट पुसले. काल पावसामुळे मध्येच खेळ थांबवण्यात आला होता. पाऊस बंद झाल्यानंतर सामना पुन्हा सुरु झाला. पण यावेळी मैदान ओलं होतं. ओल्या मैदानात खेळताना टीम इंडियाच्या प्लेयर्सना मोठ्या अडचणी आल्या असत्या. पण रघु राघवेंद्रने या सर्व खेळाडूंचे बूट व्यवस्थित पुसून त्यांना त्रास होऊ दिला नाही. रघु राघवेंद्र ब्रश घेऊन सतत खेळाडूंचे बूट पुसत होता.
कोण आहे रघु राघवेंद्र?
तुम्ही म्हणाला रघु राघवेंद्र कोण आहे? जे लोक क्रिकेट पाहतात, त्याला फॉलो करतात, त्यापैकी फार कमी जणांना त्याच्याबद्दल माहित असेल. रघु राघवेंद्र हा टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफचा भाग आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियासोबत आहे.
खरी भूमिका थ्रो डाऊन स्पेशलिस्टची
रघु राघवेंद्रची टीम इंडियामध्ये खरी भूमिका थ्रो डाऊन स्पेशलिस्टची आहे. प्रॅक्टिस सेशन दरम्यान रघु नेट्समध्ये चेंडू थ्रो करुन खेळाडूंकडून अभ्यास करुन घेतो. टीम इंडियाच्या प्रत्येक फलंदाजाला नेट्समध्ये त्याच्या थ्रो डाऊनवर अभ्यास करायचा असतो. टीम इंडियाच्या गरजेनुसार, एडिलेडमध्ये त्याची भूमिका थोडी बदलली. नेहमी नेट्समध्ये भारतीय खेळाडूंना थ्रो डाऊनची प्रॅक्टिस देणारा रघु यावेळी त्यांचे बूट साफ करत होता.
