SRH vs RR, Head to Head: सनरायजर्स हैद्राबादची आजची लढत राजस्थान रॉयल्सशी, दोघांसाठी करो या मरोची स्थिती

| Updated on: Sep 27, 2021 | 4:12 PM

गुणतालिकेत अत्यंत तळाशी असलेल्या सनरायजर्स हैद्राबाद संघाला आजचा सामना जिंकण फार महत्त्वाचं आहे. तर राजस्थान रॉयल्सला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आजचा सामना महत्त्वाचा आहे.

SRH vs RR, Head to Head: सनरायजर्स हैद्राबादची आजची लढत राजस्थान रॉयल्सशी, दोघांसाठी करो या मरोची स्थिती
राजस्थान रॉयल्स
Follow us on

IPL 2021: सनरायजर्स हैद्राबाद संघासाठी (SRH) यंदाची आयपीएल अत्यंत खराब गेली आहे. त्यांनी यंदाच्या हंगामात 9 पैकी केवळ 7 सामने जिंकले असल्याने त्यांच्यासाठी आजचा सामना करो या मरोचा असणार आहे. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्स (RR) संघाची परिस्थितीही खास नसल्याने त्यांनाही आजचा सामना जिंकण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागणार आहे. गुणतालिकेचा विचार करता हैद्राबादचा संघ 9 पैकी 1 सामना जिंकल्याने 2 पॉईंट्ससह शेवटच्या स्थानावर आहे. तर राजस्थानचा संघ 9 पैकी 4 सामने जिंकत 8 पॉईंट्ससह सहाव्या स्थानावर आहे.

आजच्या सामन्यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हटली तर हैद्राबाद संघातून दोन नवे खेळाडू मैदानात उतरताना दिसू शकतात. तर राजस्थान संघ आहे त्याच खेळाडूंसोबत खेळेल. दरम्यान गुणतालिकेत सर्वात खाली असणारे हा हैद्राबादचा संघ आज नव्या दोघांमुळे तारला जाणार का हे पाहावे लागेल. या दोन खेळाडूंपैकी एक खेळाडू म्हणजे इंग्लंडचा धाकड फलंदाज जेसन रॉय (Jason Roy). नुकत्याच म्हणजे शनिवारी 25 सप्टेंबर रोजी शारजाहमध्ये झालेल्या सामन्यात हैद्राबादला अवघ्या 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतक पत्रकार परिषदेत कोच ट्रेवर बेलिस यांनी माहिती देताना सांगितलं, ”संघातील काही परदेशी फलंदाज जे अजून खेळलेले नाहीत. त्यांना लवकरच संघात स्थान देण्याबाबत आम्ही विचार करत आहोत. पुढील सामन्यापूर्वी आमची बैठक देखील होणार आहे.” दरम्यान यातून ट्रेवर यांनी नाव न घेता जेसन रॉय लवकरच सामिल होईल, असा इशारा दिला.

टी नटराजनच्या जागीही नवीन खेळाडू दाखल

कोरोना महामारीने पुन्हा आयपीएलमध्ये शिरकाव केला सनरायजर्स हैद्राबाद संघाचा (SRH) खेळाडू आणि भारताचा गोलंदाजा टी नटराजन (T Natrajan Corona Positive) याला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे आधीच गुणतालिकेत सर्वात खाली असणाऱ्या हैद्राबादची संकट आणखी वाढली होती. त्यामुळे त्यांनी एका नव्या खेळाडूला संघात सामिल केलं आहे. उम्रान मलिक (Umran Malik) असं या खेळाडूचं नाव असून तो टी नटराजनच्या जागी संघातून खेळणारा आहे. उम्रान हा जम्मू आणि काश्मीर संघातील खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत एक टी20 आणि लिस्ट A सामने खेळले असून त्यामध्ये 4 विकेट्स घेतले

आतापर्यंत राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद

राजस्थान आणि हैद्राबादचे संघ आतापर्यंत 14 वेळा एकमेंकासोबत भिडले आहेत. त्यापैकी दोघांनी प्रत्येकी 7 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोघांची आतापर्यंतची लढत तरी चुरशीची असल्यामुळे आजचा सामनाही रंगतदार होणार यात शंका नाही.

आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11

राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन(कर्णधार आणि यष्टीरक्षक),  एविन लुईस, यशस्वी जैसवाल, डेविड मिलर, लियाम लिव्हिंगस्टोन, राहुल तेवतिया, माहिपार लोमरोर, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी, मुस्तफिजूर रेहमान, चेतन सकारीया

सनरायजर्स हैद्राबाद – डेव्हिड वॉर्नर, रिद्धिमान साहा  (यष्टीरक्षक), मनिष पांडे, केन विल्यमसन (कर्णधार), विराट सिंग, अब्दुल समाद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा

हे ही वाचा

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीचा कसोटी क्रिकेटला रामराम, निवृत्तीबाबत म्हणाला…

IPL 2021 : हॅट्रिकदरम्यानचा ‘तो’ चेंडू सर्वोत्तम, हर्षल पटेलकडून फेव्हरेट विकेटचा खुलासा

IPL वर नजर, लक्ष्य T-20 वर्ल्डकपवर, सामन्यानंतर विराटची आऊट ऑफ फॉर्म इशान किशनसोबत सिरियस चर्चा

(Know Head to head of todays match SRH vs RR match and Know probable playing 11 for Todays IPL Match)