IPL वर नजर, लक्ष्य T-20 वर्ल्डकपवर, सामन्यानंतर विराटची आऊट ऑफ फॉर्म इशान किशनसोबत सिरियस चर्चा

खेळाडूंसाठी देश मोठा की आयपीएल? हा प्रश्न अनेक वेळा निर्माण झाला आहे. विराट कोहलीचे रविवारी मुंबईविरुद्धचा सामना संपल्यानंतरचे काही फोटो या प्रश्नाचं उत्तर असू शकतात.

IPL वर नजर, लक्ष्य T-20 वर्ल्डकपवर, सामन्यानंतर विराटची आऊट ऑफ फॉर्म इशान किशनसोबत सिरियस चर्चा
Virat - Ishan

मुंबई : खेळाडूंसाठी देश मोठा की आयपीएल? हा प्रश्न अनेक वेळा निर्माण झाला आहे. विराट कोहलीचे रविवारी मुंबईविरुद्धचा सामना संपल्यानंतरचे काही फोटो या प्रश्नाचं उत्तर असू शकतात. आता तुम्ही म्हणाल की, या फोटोंमध्ये काय विशेष आहे. तर आम्ही ज्या फोटोंबद्दल बोलत आहोत ते फक्त साधे फोटो नाहीत, तर विराट कोहलीची आगामी टी -20 विश्वचषकासाठीची तयारी आहे. (Virat Kohli Puts Arm around Ishan Kishan’s Shoulders as MI’s Gem Struggles for Form in IPL 2021)

एक कर्णधार, एक वरिष्ठ खेळाडू काय करू शकतो, हे विराट कोहलीच्या मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर व्हायरल झालेल्या फोटोंमधून कळेल. आयपीएलमध्ये, आरसीबीचा कर्णधार विराट कोहली या फोटोंमध्ये मुंबई इंडियन्सचा फलंदाज इशान किशनसोबत चर्चा करताना दिसत आहे. दुबईतील मुंबई आणि बंगळुरूचा सामना संपल्यानंतर विराटने इशान किशनसोबत बराच वेळ चर्चा केली.

असे म्हटले जाते की, चित्र अनेकदा बरंच काही बोलतात आणि हे चित्र देखील काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविक, विराट कोहलीची नजर नक्कीच आरसीबीचा कर्णधार म्हणून आयपीएल 2021 वर आहे, पण त्याचं लक्ष्य फक्त टी – 20 विश्वचषकावर आहे. मुंबई इंडियन्सचा खेळाडू इशान किशन हा विराटच्या टी -20 विश्वचषक मिशनचा अविभाज्य भाग आहे. पण, समस्या अशी आहे की, इशान किशन सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. ज्या खेळपट्ट्यांवर टी -20 विश्वचषक खेळायचा आहे, त्यावर टीम इंडियाच्या या तरुण खेळाडूची बॅट शांत आहे. त्यामुळे या सामन्यानंतर विराट कोहली आयपीएलपूर्वी देशाचे हित लक्षात ठेवून इशान किशनसोबत बोलत होता.

IPL 2020 चा हिरो IPL 2021 मध्ये फेल

IPL 2021 मध्ये इशान किशनला मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 8 सामन्यांमध्ये संधी दिली आहे. यामधील 8 डावांमध्ये फलंदाजी करताना इशान किशनने अवघ्या 13.37 च्या सरासरीने 107 धावा जमवल्या आहेत. या 8 सामन्यांमध्ये त्याने केवळ 5 चौकार आणि 3 षटकार ठोकले आहेत. हाच इशान किशन आयपीएल 2020 मध्ये मुंबईकडून सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज होता. आयपीएल 2020 मध्ये इशानने 14 सामन्यांमध्ये 145 च्या स्ट्राईक रेटने तब्बल 516 धावा चोपल्या होत्या. यात 30 षटकार आणि 36 चौकारांचा समावेश होता. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा पराक्रम त्याने केला होता. इशान किशनचा फॉर्म सध्या मुंबई इंडियन्सची मोठी चिंता आहे, मात्र त्याचा फॉर्म विराट कोहलीसाठीदेखील महत्त्वाचा आहे, कारण इशान किशन आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराटच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाचा भाग असणार आहे.

(Virat Kohli Puts Arm around Ishan Kishan’s Shoulders as MI’s Gem Struggles for Form in IPL 2021)

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI